www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्प २०१३-१४मध्ये ६७ नव्या एक्सप्रेस आणि २७ नव्या पॅसेंजर ट्रेनची घोषणा केलीय.
पाच मेमू आणि आठ डेमू ट्रेनही लवकरच सुरू करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलंय. मुंबईत लोकलमध्य एसी डब्बे लावण्यात येणार आहेत. कोलकाता आणि मुंबईत एसी ईएमयू ट्रेन चालवण्यात येतील. कोलकातामध्ये ८० आणि चेन्नईमध्ये ३० ट्रेनमध्ये डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
काही महत्त्वाच्या घोषणा
> ६७ नव्या एक्सप्रेस ट्रेन... तर २६ नव्या पॅसेंजर ट्रेन
> पाच मेमू आणि आठ डेमू ट्रेन सुरु करणार
> पंढरपूर - मंगळवेढा - विजापूर नवीन रेल्वे गाडी
> परभणी - मनमाड दरम्यान नवीन गाडी
> कल्याण- कर्जतमध्ये तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव
> मुंबईत लोकलच्या अतिरक्त ७२ फेऱ्या
> जम्मूच्या कटारापर्यंत रेल्वे जाणार
> विद्यार्थ्यांसाठी 'आझादी एक्सप्रेस'
नवीन ट्रेनची संपूर्ण सूची
1. अहमदाबाद - जोधपूर एक्सप्रेस (साप्ताहिक)
2. (नागपूर) अजनी - लोकमान्य टिळक व्हाया हिंगोली एक्सप्रेस (साप्ताहिक)
3. अमृतसर - लालकौन एक्सप्रेस, व्हाया चंदीगड (साप्ताहिक)
4. बांद्रा टर्मिनस - रामनगर एक्सप्रेस, व्हाया नागदा (साप्ताहिक), मथुरा, कानपूर, लखनऊ, रामपूर
5. बांद्रा टर्मिनस वाया मारवाड, जोधपूर जैसलमेर एक्सप्रेस (साप्ताहिक)
6. बांद्रा टर्मिनस - हिसार एक्सप्रेस वाया अहमदाबाद (साप्ताहिक), पालनपूर, मारवाड, जोधपूर, देगना
7. बांद्रा टर्मिनस - हरिद्वार एक्सप्रेस, व्हाया वलसाड (साप्ताहिक)
8. बंगळुरू - मंगलौर एक्सप्रेस (साप्ताहिक)
9. बठिंडा - जम्मू तवी एक्सप्रेस, व्हाया पटियाला, राजपुरा (साप्ताहिक)
10. भुवनेश्वर - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, व्हाया संबलपूर
(साप्ताहिक)
11. बीकानेर - चेन्नई एसी एक्सप्रेस, व्हाया जयपूर (साप्ताहिक), सवाई माधोपूर, नागदा, भोपाल, नागपूर
12. चंडीगढ़ - अमृतसर इंटरसिटी एक्सप्रेस, व्हाया साहिबजादा, अजीतसिंह नगर (मोहाली), लुधियाना (दैनिक)
13. चेन्नई - कराइकुडी एक्सप्रेस (साप्ताहिक)
14. चेन्नई - पालानी एक्सप्रेस (प्रतिदिन)
15. चेन्नई एग्मोर - तंजावुर एक्सप्रेस, व्हाया विल्लुपुरम, माइलादुत्रयी (प्रतिदिन)
16. चेन्नई - नागारसोल एक्सप्रेस (साई नगर शिर्डीसाठी) (साप्ताहिक)
17. चेन्नई - वेलनकन्नी लिंक एक्सप्रेस
18. कोइम्बतूर - मन्नारगुडी एक्सप्रेस, व्हाया तंजावूर, मन्नारगुडी (प्रतिदिन)
19. कोइम्बतूर - रामेश्वरम एक्सप्रेस (साप्ताहिक)
20. दिल्ली - बठिंडा वाया फिरोजपूर इंटरसिटी एक्सप्रेस (दैनिक)
21. दिल्ली सराय रोहिल्ला - आमान परिवर्तन के बाद सीकर एक्सप्रेस (द्वि - साप्ताहिक)
22. दिल्ली - होशियारपूर एक्सप्रेस (साप्ताहिक)
23. दुर्ग - जयपूर एक्सप्रेस (साप्ताहिक)
24. गांधीधाम - विशाखापट्टनम एक्सप्रेस वाया अहमदाबाद (साप्ताहिक), वर्धा, बल्लारशाह, विजयवाड़ा
25. हजरत निजामुद्दीन - मुंबई एसी ट्रेन, व्हाया भोपाल, खंडवा, भुसावळ (साप्ताहिक),
26. हावडा - चेन्नई एसी, व्हाया भद्रक (द्वि - साप्ताहिक) एक्सप्रेस
27. हावड़ा - न्यू जलपाईगुड़ी एसी एक्सप्रेस, व्हाया मालदा टाऊन (साप्ताहिक)
28. हुबली - मुंबई एक्सप्रेस, व्हाया मिरज पुणे (साप्ताहिक)
29. इंदौर - चंडीगड एक्सप्रेस वाया देवास (साप्ताहिक), उज्जैन, गुना, ग्वालियर, हजरत निजामुद्दीन
30. जबलपुर -यशवंतपूर एक्सप्रेस, व्हाया नागपूर, धर्मावरम (साप्ताहिक)
31. जयपूर - लखनऊ एक्सप्रेस, व्हाया बांदीकुई, मथुरा, कानपूर (आठवड्यात तीन दिवस)
32. जयपूर - अलवर एक्सप्रेस (प्रतिदिन)
33. जोधपूर - जयपूर एक्सप्रेस, व्हाया फुलेरा (प्रतिदिन)
34. जोधपूर - कामाख्या (गुवाहाटी) एक्सप्रेस, व्हाया देगाना, रतनगड (साप्ताहिक)
35. काकीनाडा - मुंबई एक्सप्रेस (द्वि - साप्ताहिक)
36. कालका - साई नगर शिर्डी, व्हाया हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (आठवड्यातून दोन दिवस), भोपाल, इटारसी
37. कामाख्या (गुवाहाटी) - आनंद विहार एक्सप्रेस, व्हाया कटिहार (साप्ता