मुंबईच्या पदरी निराशा, केवळ एसी डबे, ७२ लोकल फेऱ्या

मुंबईत सहा आणि ठाण्यात चार खासदार असताना मुंबईसाठी या खासदारांनी रेल्वेबाबत काहीही सूचना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या पदरी निराशा आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात केवळ ७२ नव्या लोकल आणि लोकलच्या गाड्यांना वातानुकुलीत (AC) डबे जोडण्याचा विचार करण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 26, 2013, 02:43 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईत सहा आणि ठाण्यात चार खासदार असताना मुंबईसाठी या खासदारांनी रेल्वेबाबत काहीही सूचना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या पदरी निराशा आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात केवळ ७२ नव्या लोकल आणि लोकलच्या गाड्यांना वातानुकुलीत (AC) डबे जोडण्याचा विचार करण्यात आला आहे.
लोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला काय मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, आधींच्या निराशाजनक अर्थसंकल्पांचा विचार करता, यावेळी मुंबईसाठी थोडीशी खुशखबर देण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकलच्या गाड्यांचा वातानुकुलीत (AC) डबे जोण्यात येणार आहेत. तर लोकलच्या ७२ नव्याने फेर्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न झालाय.
मात्र, मुंबईबरोबरच मुंबई उपनगरातील अनेक समस्या सोडविण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. मुंबईत सहा आणि ठाण्यात चार खासदार असताना पुन्हा एकदा मुंबईच्या वाट्याला निराशा आली आहे. १० खासदारांनी रेल्वेच्या सुधारणांसाठी काहीही केले नसल्याचे दिसून आले आहे.

मात्र, कोलकातासाठी १८ गाड्या सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर सोनिया गांधी यांच्या रायबरेलीत कारखाना काढला गेलाय. त्यामुळे मुंबईकरांकडून संताप व्यक्त होत आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना मुंबईसाठी रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ठळक वैशिष्ट्य
- मुंबईतील लोकलच्या ७२ नव्याने अतिरिक्त फेऱ्या
- मुंबईतील काही मार्गावर धावणाऱ्या लोकलला एसी डबे
- मुंबईत इलिबेटेड रेलकॉरिडर
- कल्याण - कर्जत दरम्यान तिसरी रेल्वेची लाईन टाकणार
- मुंबई हुबळी आठवड्यातून एकदा
- मुंबई-सोलापूर नव्यान एक्प्रेसची घोषणा
- मुंबई-सोलापूर आठवड्यातून सहावेळा धावणार
- कुर्ला निजामाबाद एक्सप्रेस आठवड्यातून एकदा धावणार