मुंबई : एका दंतकथेनुसार राजा दक्ष जो ब्रह्मदेवाचा पुत्र होता त्याने आपल्या २७ कन्यांचा म्हणजेच नक्षत्रांचा विवाह चंद्रासोबत लावला. पण, चंद्राला मात्र केवळ 'रो्हिणी'चं आकर्षण होतं. ही बाब काही त्याच्या इतर पत्नींना पटली नाही. म्हणून त्यांनी आपल्या वडिलांकडे धाव घेतली.
नाराज झालेल्या दक्षाने मग चंद्राला शाप दिला की तुझ्या शरीराची झीज होईल. शापाप्रमाणे चंद्राचा कलेकलेने आकार कमी होऊ लागला. आपले अस्तित्वच नाहीसे होईल या भितीने चंद्राने शंकराकडे मदतीसाठी धावा केला.
शंकराने अस्तित्व गमावणाऱ्या चंद्राला आपल्या मस्तकावर आश्रय घेण्याची सूचना केली आणि दक्षाच्या शापापासून त्याचे संरक्षण केले. तेव्हापासूनच भगवान शंकरांना 'चंद्रशेखर' आणि 'सोमनाथ' म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
आजही दक्षाच्या शापामुळे दर ठराविक काळाने चंद्राचा आकार कमी आणि जास्त होत आहे, असा समज आहे.