www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कुंडलीतील राहू, केतू तसंच शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी आमावस्येला विशेष उपाय केले जातात. या रात्री केलेले उपाय लवकर फळ देतात.
राहू तूळ राशीत किंवा केतू मेष राशीत असतो तेव्हा ही मौनी आमावस्या येते. बृहस्पती सोडून सर्व ग्रह राहू केतूच्यामध्ये असतात. या योगाला मौनी आमावस्या म्हणतात. मौनी आमावस्येला रात्री पिंपळ किंवा आंब्याच्या समिधांचा होम केला जातो. त्यात तिळाचं तेल, कापूस, मोहरी, मोहरीचं तेल यांचं लोखंडी चमच्याने हवन केलं जातं. विशेष म्हणजे यावेळी कुठल्याही मंत्राचा उच्चार करत नाही. या विधीमुळे अडलेली अनेक कामं होतात. हा विधी केल्यानंतर दान करावं.
या विधीनंतर पितरांची शांती केली जाते. त्यासाठी एका रिकाम्या काश्याच्या भांड्यासोबत तांब्याच्या भांड्यात दूध, पाणी, काळं वस्त्र, गहू आणि काळे तीळ यांचं दान करावं. वड-पिंपळ यांसारख्या झाडांना दूध अर्पण करावं. या दिवशी पक्ष्यांना बाजरीचे दाणे टाकावेत. त्यामुळे ग्रहशांती होते. तसंच कालसर्पातून मुक्ती मिळते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.