जन्म महिन्यानुसार कसा आहे तुमचा स्वभाव, घ्या जाणून

मुंबई : प्रत्येकाचा जन्मतारखेप्रमाणे स्वभाव जसा बदलत असतो तसाच जन्म महिन्यानुसार ढोबळमानाने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, याचा अंदाज लावता येतो.

Updated: Mar 22, 2016, 09:16 AM IST
जन्म महिन्यानुसार कसा आहे तुमचा स्वभाव, घ्या जाणून  title=

मुंबई : प्रत्येकाचा जन्मतारखेप्रमाणे स्वभाव जसा बदलत असतो तसाच जन्म महिन्यानुसार ढोबळमानाने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, याचा अंदाज लावता येतो. खाली दिलेल्या माहितीत मुलींचा त्यांच्या जन्म महिन्यानुसार स्वभाव दिलेला आहे. तुमची जन्मतारीख कोणत्या महिन्यात येते त्यानुसार तुमचा स्वभाव कसा आहे ते तुम्ही तपासू शकता. 

जानेवारी
जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुली सुंदर असण्यासोबतच हुशारही असतात. या मुलींना चांगल्या उंची कपड्यांची आवड असते. कोणत्याही गोष्टींबद्दल त्या लवकर बोअर होतात. आपल्या मनातल्या भावना त्या लवकर बाहेर येऊ देत नाहीत. त्यांचं मन कोणाकडून दुखावलं गेलं तर मात्र त्या सामान्य होण्यासाठी बराच वेळ घेतात. संवेदनशील असण्यासोबतच या मुली आपल्या शिक्षण आणि करिअरविषया बऱ्याच महत्त्वाकांक्षी असतात. 

फेब्रुवारी
फेब्रुवारीत जन्मलेल्या मुली समजदार आणि चलाख असतात. खूप सुंदर असल्या तरी त्या लाजाळू असतात. आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात जिद्द असते. त्यांना स्वतंत्रपणे जगायला आवडतं. या स्वातंत्र्यावर बंधनं आली तर मग मात्र त्या विद्रोही होऊ शकतात. त्यांना मित्र-मैत्रीणी भरपूर असतात. त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम केलं तरी ते प्रेम दाखवत नाहीत. 

मार्च
मार्च महिन्यात जन्मलेल्या मुली खऱ्या, मनाने निर्मळ आणि कमजोर मनाच्या असतात. त्यांना एकांत आणि शांतता यांची आवड असते. त्यांच्यावर सहजपणे विश्वास दाखवला जाऊ शकतो. त्या आपल्या भावनांचे प्रदर्शन करत नाहीत. सर्व काही आपल्या मनात ठेवतात. 

एप्रिल
एप्रिल महिन्यात जन्मलेल्या मुली मृदू स्वभावाच्या पण चालू असतात. त्यांचा स्वभाव मजेदार असतो. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असते. त्यांचा स्वभाव जिद्दी असतो. त्यांना लोकांशी बोलायला आवडते. त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असतो. इतरांनाही त्या नेहमी प्रोत्साहन देतात. त्यांना खेळण्याची आणि फिरण्याची आवड असते. 

मे
मे महिन्यात जन्मलेल्या मुली कठोर स्वभावाच्या आणि जिद्दी असतात. त्यांच्यात इच्छाशक्ती मोठ्या प्रमाणावर ठासून भरलेली असते. त्या तापट स्वभावाच्या असल्याने त्यांना राग लगेच येतो. दुसऱ्या मुलांना आपल्याकडे आकर्षित करणे आणि त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे यात त्यांना विशेष आनंद मिळतो. साहित्य आणि कलेची त्यांना आवड असते. 

जून
जूनमध्ये जन्मलेल्या मुलींचं व्यक्तीमत्व आकर्षक असतं. त्यांना मैत्री करायला आवडते. फ्लर्ट करणंही त्यांना चांगलं जमतं. सिनेमा बघणंही त्यांना आवडतं. त्यांच्या चांगल्या दिसण्यामुळे अभिनेत्री होण्याची क्षमताही त्यांच्यात असते. 

जुलै
जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या सोबत राहणे इतरांना चांगले वाटते. त्यांचा स्वभाव समजणे तसे कठीण असते. त्यांना सत्य बोलणे आवडते. त्यांचा स्वभाव मूडी असतो. दुसऱ्यांविषयी काळजी करणारा त्यांचा स्वभाव असतो. पण, कोणत्याही गोष्टीने त्या पटकन दुखावल्या जातात. त्या पटकन भडकत नाहीत, पण भडकल्या तर वाईट असतात. इतरांना माफ केले तरी त्या कोणाचेही कृत्य विसरत नाहीत. 

ऑगस्ट
ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या मुली आव्हान पेलण्यास नेहमी तयार असतात. त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो. त्यांचे मन अगदी मृदू असते. त्यांचे बोलणे मात्र धारदार असते. हुल्लडबाजी करणे त्यांना आवडते. त्यांना संगीताची आवड असते. अभ्यासात मात्र त्यांना रुची नसते. 

सप्टेंबर
सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींचे विशेष म्हणजे त्या घाईघाईत एखादा निर्णय घेतात आणि मग त्याचा पश्चात्ताप करतात. त्यांचे मन अगदी कठोर असते आणि स्वभावही निर्भिड असतो. आर्थिक व्यवहार त्या अगदी उत्तम पार पाडतात. प्रेम करणे त्यांना आवडते. त्यांची बुद्धीसुद्धा तल्लख असते. 

ऑक्टोबर
ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलींना इतरांशी गप्पा मारायला आवडते. त्यांच्यावर जे प्रेम करतात त्या व्यक्तींवर त्यासुद्धा जीवापाड प्रेम  करतात. त्यांना खोटे बोलणेही चांगले जमते. राग मात्र लवकर येतोय. आयुष्यात मित्र मैत्रिणींचे स्थान मात्र अनन्यसाधारण असते. लवकर हर्ट झाल्या तरी त्यांची समजूत घालणे सोपे असते. 

नोव्हेंबर
नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली स्वभावाने इमानदार असतात. त्या कामुक स्वभावाच्या असल्या तरी धोकादायक असतात. इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्याची विशेष क्षमता त्यांच्याकडे असते. त्यांचा स्वभाव चंचल असतो. मोठ्या समुदायात त्या ठळक उठून दिसतात. 

डिसेंबर
डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली प्रामाणिक, राष्ट्रभक्त आणि महत्वाकांक्षी असतात. त्यांना खूप पुढचा विचार करायला आवडतो. काही वेळेस त्यांचा हा विचार इतरांच्या पचनी पडत नाही. बोलताना त्या प्रेमळ वाटतात. एकाच मुलासोबत त्या प्रामाणिक असतात.