विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय...

आज 3 डिसेंबर शनिवार मार्गशीर्ष मासातील विनायक चतुर्थी. समस्त देवांमध्ये प्रथम पुजिले जाणारे दैवत म्हणजे श्रीगणेश. कोणतेही शुभ कार्य सुरु कऱण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. 

Updated: Dec 3, 2016, 09:59 AM IST
विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय... title=

मुंबई : आज 3 डिसेंबर शनिवार मार्गशीर्ष मासातील विनायक चतुर्थी. समस्त देवांमध्ये प्रथम पुजिले जाणारे दैवत म्हणजे श्रीगणेश. कोणतेही शुभ कार्य सुरु कऱण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. 

या दिवशी गणेशाची मनोभावे पूजन केल्यास मनीच्या इच्छा पूर्ण होतात. भगवान गणेशाची कृपा आपल्यावर कायम राहते. गणेश मंत्राचा जप केल्याने मनात सकारात्मक भाव येतात. 

चतुर्थीच्या दिवशी गणेश मंत्राचा जप करण्यासोबतच गणेशाच्या प्रतिमेची मनोभावे पूजा केली पाहिजे. य़ावेळी कुंकू, अक्षता, दूर्वा, सुपारी, फुल, जान्हवं, बुंदी अथवा बेसनचा लाडू, मिठाई आदी गणेशाला अर्पण करुन त्याची पूजा करावी. 

पूजा झाल्यानंतर गणेशाची आरती करावी तसेच ॐ श्री गणेशाय नम: आणि ॐ नमो शिवाय असा जप करावा. तसेच गणेशाची कृपादृष्टी कायम राहो अशी मनोभावे प्रार्थना करावी.