घरात या वस्तू कधीही ठेवू नका

अनेकदा अधिक मेहनत घेऊनही घरात धनलक्ष्मीचे वास्तव्य राहत नाही. असं म्हटलं जात की घरातील सुख-समृद्धी त्या वास्तुच्या वातावरणावर अवलंबून असते. त्यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहण्यासाठी घरात या वस्तू ठेवू नयेत.

Updated: Jan 10, 2016, 11:52 AM IST
घरात या वस्तू कधीही ठेवू नका title=

नवी दिल्ली : अनेकदा अधिक मेहनत घेऊनही घरात धनलक्ष्मीचे वास्तव्य राहत नाही. असं म्हटलं जात की घरातील सुख-समृद्धी त्या वास्तुच्या वातावरणावर अवलंबून असते. त्यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहण्यासाठी घरात या वस्तू ठेवू नयेत.

घरात कधीही तुटलेले फुटलेले सामान ठेवू नका. शास्त्रांनुसार घरात अशी भांडी ठेवल्यास लक्ष्मी अप्रसन्न राहते. 

फुटलेला आरसा कधीही घरात ठेवू नये. यामुळे नकारात्मक उर्जा घरात सक्रिय होते.

पूजा करताना दिवा, देवी-देवतांच्या मूर्ती, सोनं, शंख यासारख्या वस्तूंना जमिनीवर ठेवू नका. या वस्तू ठेवण्यासाठी जमिनीवर कपडा अंथरा अथवा उंच जागेवर ठेवा.

हल्ली अनेकांना बेडरुममध्ये जेवण्याची सवय असते. जेवणानंतर उष्टी भांडी तेथेच ठेवली जातात. मात्र असे न करता ही भांडी किचनमध्ये ठेवा. 

बंद पडलेले जुने घड्याळही कधी घरात ठेवू नये. घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपली प्रगती होत असते. 

कधीही तिजोरीत वादासंबंधित कागदपत्रे ठेवू नयेत. 

स्टोर रुम तसेच बाथरुमच्या जवळ देवघर नसावे. 

Tags: