बेडवर का असावी गुलाबी चादर?

बेडवर का असावी गुलाबी चादर. गुलाबी चादर ठेवल्याचे अनेक फायदे जीवनात अनुभवायला मिळतात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 24, 2013, 03:44 PM IST

www.24taas.com,मुंबई
आपण नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करतो. त्यासाठी घरात होम-हवन, यज्ञ असे धार्मिक कार्य आलेच. अशा वास्तुशांतीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुशांती केल्यानंतर घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो. ज्यामुळे आयुष्यात चांगला फरख दिसतो. तसेच बेडवर का असावी गुलाबी चादर. गुलाबी चादर ठेवल्याचे अनेक फायदे जीवनात अनुभवायला मिळतात.
सुखी वैवाहीक जीवनातील महत्वाचा वाटा हा तुमच्या बेडच्या बेडशीटचा देखील असतो. वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीत परस्परांबद्दल प्रेम वाढवण्यासाठी बेडवरची चादर ही लाईट कलरची, गुलाबी, पांढरी अथवा क्रिम रंगाची असावी. त्यामुळे ते सुखी जीवनासाठी चागंले.
सकारात्मक विचारांसाठी बेडवरील चादर नेहमी स्वछ असली पाहिजे. चादरीवरचे मोठे-मोठे फुलांचे चित्र शुभ मानले जातात.
कुणाचे लग्न जमत नसेल त्या व्यक्तीने गुलाबी रंगाच्या चादरीचा उपयोग केला पाहिजे सोबत त्याच्यावरती गुलाबाच्या फुलांचे चित्र असले पाहिजे. बेडशीट कुठूनही फाटलेली नसावी. त्यामुळे तुमच्या विचारात बद्दल होवू शकतात.