मुंबई : व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेतला जातो. यासाठी तुम्हाला केवळ तुमची जन्मतारीख माहित असणे गरजेचे असते. अंकशास्त्राच्या आधारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा परफेक्ट पार्टनर कोण होऊ शकतो हे ही जाणून घेऊ शकता.
१ नंबर - या व्यक्ती साधारण गोड स्वभावाच्या असतात. तसेच अनुशासित तसेच समजूतदार असतात. तसेच आपल्या अधिकारांबाबत जागरुक असतात.
जन्मतारीख - १, १०, १९, २८
पार्टनर नंबर - २,३,९
यातील २ नंबरचे पार्टनर साधारण शांत स्वभावाचे त्यामुळे १ नंबरवाला पार्टनर त्याच्यावर आपला दबाव बनवून ठेवतो. नंबर तीनचे पार्टनर फ्रेंडली असतात. ९ नंबरवाले पार्टनर यांच्यासाठी परफेक्ट जोडीदार असतात.
२ नंबर - या व्यक्ती आकर्षक आणि विन्रम स्वभावाच्या असतात. यांना कलाक्षेत्रात रुची असते. तसेच रोमँटिकही असतात.
जन्म तारीख : २, ११, २०, २९
पार्टनर नंबर: १, ३, २
१ नंबरवाले जोडीदार सपोर्टिव्ह तसेच चांगले मित्र होऊ शकता. २ नंबरवाल्या जोडीदाराशी यांचे चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. नंबर ३ वाल्या व्यक्ती यांचे केवळ चांगले मित्रच नव्हे तर चांगले फिलॉसफर जोडीदार बनू शकतात.
३ नंबर - या व्यक्ती आध्यात्मिक तसेच अनुशासित , आत्मकेंद्री आणि फ्रेंडली असतात. याचे विचार स्वतंत्र तसेच बोल्ड असतात. तसेच या व्यक्ता मेहनतीही असतात.
जन्मतारीख - ३,१२, २१,
पार्टनर नंबर - १,२,९
नंबर १ आणि नंबर ३ या दोन्ही व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतात. याच्यात चांगले संबंध प्रस्थापित होतात. नंबर २ आणि ३ नंबरवाल्या व्यक्ती आपल्या जोडीदाराला चांगल्या त-हेने समजून घेतात. ९ नंबरवाल्या व्यक्ती एनर्जेटिव्ह असतात. तसेच अथक मेहनतीवर यांचा विश्वास असतो.
४ नंबर - एखाद्या गोष्टीबाबत गुप्तता पाळणे, लवकर राग येणे हा तुमच्या स्वभाव आहे. तुमच्या जीवनात चढ-उतार येत असतात.
जन्मतारीख - ४,१३, २२, ३१
पार्टनर नंबर - ५,७,८
५ नंबरवाले जोडीदार चांगले मित्र बनू शकतात. मात्र चांगले लाईफ पार्टनर बनू शकत नाहीत. ७ नंबरवाल्या व्यक्ती चांगला मित्र आणि जोडीदार असे दोन्ही गुण असतात. नंबर ८वाल्या व्यक्तींशी यांचे चांगले जुळते.
५ नंबर - तुम्ही खूप समजूतदार, भावूक आणि एंटरटेनिंग स्वभावाच्या असतात. तुमच्या डोक्यात सतत काही ना काही विचार सुरु असतात.
जन्मतारीख - ५, १४, २३
पार्टनर नंबर - १,४,६
नंबर १ वाल्या व्यक्तींशी तुमचे चांगले जमते. ४ नंबरवाल्या व्यक्ती चांगला जोडीदार बनू शकत नाही मात्र चांगले मित्र बनू शकतात. ६ नंबरवाल्या व्यक्तींशी यांचे चांगले जुळते.
६ नंबर - यांचा स्वभाव विनम्र आणि डिप्लोमॅटिक असतो. तसेच रोमँटिकही असतात.
जन्मतारीख - ६,१५, २४
पार्टनर नंबर - ४,५,८
४ नंबरवाल्या व्यक्तींशी यांचे चांगले जुळते मात्र एकमेकांचे सल्ले ऐकत नाहीत. नंबर ५च्या व्यक्ती चांगला सहयोगी बनू शकतात. नंबर ८च्या व्यक्ती कठीण परिस्थितीलाही तोंड देऊ शकतात.
७ नंबर - तुम्ही खूप समजूतदार तसेत क्रियाशील स्वभावाच्या व्यक्ती आहात. तुम्हाला स्वप्नात जगायला आवडते. तसेच तुम्ही मूडी आहात.
जन्मतारीख - ७.१६, २५
पार्टनर नंबर - १,२,९
१ नंबरवाल्या यांच्यासाठी लकी ठरु शकतात. नंबर २शी यांची चांगले मैत्री होऊ शकते. नंबर ९वाल्या व्यक्ती यांना प्रॅक्टिकली कसे जगायचे हे शिकवतात.
नंबर ८ - या व्यक्ती मेहनती तसेच दूरदृष्टी ठेवणाऱ्या असतात. मात्र अनेकदा यांना लोक समजून घेत नाहीत.
जन्मतारीख - ८,१७, २६
पार्टनर नंबर - १,२
नंबर १ आणि नंबर८च्या व्यक्ती विरोधी असतात त्यामुळे एकमेकांना आकर्षित होतात. नंबर २च्या व्यक्ती यांना खूप सपोर्ट करणाऱ्या असतात.
९ नंबर - या व्यक्ती थोड्याच्या हट्टी स्वभावाच्या असतात. तसेच सतत भेदभाव करणाऱ्या असतात. यांना रागही लगेच येतो.
जन्मतारीख - ९, १८, २७
पार्टनर नंबर - १,४,५
१ नंबरवाल्या व्यक्ती यांची नेहमी मदत करणारे असतात. नंबर ४ आणि ९ नंबरच्या व्यक्ती विरोधी स्वभावाच्या असतात. ५ नंबरवाल्या व्यक्तींशी यांचे चांगले संबंध प्रस्थापित होतात.