रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त

भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे अखंड रक्षण करण्याची ग्वाही देतो.

Updated: Jul 30, 2016, 01:06 PM IST
रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त title=

मुंबई : भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे अखंड रक्षण करण्याची ग्वाही देतो.

देशभरात हा सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी १८ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. 

त्यामुळे रक्षाबंधन साजरा कऱण्यासाठी दुपारी एक वाजून १६ मिनिटांपासून ते ३ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या वेळेत राखीपोर्णिमा साजरी केल्यास शुभदायी ठरते.