गणपतीला का अर्पण करावा मोदकांचा नैवेद्य?

आपल्याकडे प्रत्येक मंगलप्रसंगी गणपतीच्या पुजेने प्रारंभ करण्याची पद्धत आहे. शुभकारक असणाऱ्या गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक अर्पण केले जातात. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2013, 05:55 PM IST

www.24taas.com, मुंबई
आपल्याकडे प्रत्येक मंगलप्रसंगी गणपतीच्या पुजेने प्रारंभ करण्याची पद्धत आहे. शुभकारक असणाऱ्या गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक अर्पण केले जातात. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात.
मोदक म्हणजे आनंद देणारा पदार्थ. मोद म्हणजे आनंद. जो पदार्थ आनंद देतो, तो मोदक. मोदक गोड असतो आणि सात्विक आहार असतो. यामुळे मोदक खाल्ल्यामुळे पोटही भरतं आणि मनालाही समाधान वाटतं.
गणपतीचा वार हा जरी मंगळवार मानला जात असला, तरी बुधवारी गणपतीला मोदक अर्पण करावा. बुधवार हा बुद्धी देणाऱ्या बुधाचा वार असतो. या दिवशी बुद्धीचा अधिपती असणाऱ्या गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद ग्रहण करणाऱ्यांना सद्बुद्धीचा लाभ होतो आणि मन प्रसन्न राहातं.