पैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत!

हिंदू संस्कृतीमध्ये महालक्ष्मीच्या व्रताला मोठं महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हातानं ही पूजा केली जाते. 

Updated: Sep 21, 2015, 03:38 PM IST
पैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत! title=

मुंबई : हिंदू संस्कृतीमध्ये महालक्ष्मीच्या व्रताला मोठं महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हातानं ही पूजा केली जाते. 

भगवान विष्णूची पत्नी महाक्ष्मी हिला प्रसन्न करण्यासाठी ही पूजा केली जाते. महालक्ष्मी ही संपत्ती व समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. काही सोप्या गोष्टी या व्रताच्या काळात ध्यानात ठेवाव्यात...  

- महालक्ष्मीच्या व्रतादरम्यान मांसाहारी जेवण वर्ज्य करावं.

- एक कलश पाण्यानं भरून कलशाच्या तोंडावर आंब्याची पानं, नारळ ठेवावं. 

- या कलशाला लाल रंगाच्या कपड्यानं घट्ट लपेटून घ्यावं. यावर कुंकवाच्या साहाय्यानं स्वस्तीक काढून घ्यावं. स्वतीक हे चतुर्वेद आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. 

- या कलशामध्ये थोडे तांदळाचे दाणे आणि सुटे नाणे टाकून ठेवावेत. या कलशाची पूजा महालक्ष्मी म्हणून केली जाते. 

- यानंतर, तुम्हाला हवी तशी या कलशाच्या शेजारी सजावट करू घ्या... दिव्यांची माळ, हार, फुलं, रांगोळी या गोष्टी सजावटीसाठी वापरल्या जातात.

- पूजेदरम्यान, लक्ष्मी अष्टस्तोत्र, सतनामावली आणि लक्ष्मी सहस्रनाम स्तोत्र यांचं पठन केले जातं. 

- पूजेदरम्यान नऊ पद्धतींची मिठाईंचा नैवेद्य महालक्ष्मीला वाढवावा.

- श्री धन लक्ष्मी, श्री गज लक्ष्मी, श्री वीर लक्ष्मी, श्री ऐश्वर्य लक्ष्मी, श्री विजयालक्ष्मी, आदिलक्ष्मी, धान्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी अशा आठ प्रकारच्या रुपांत महालक्ष्मी ओळखली जाते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.