श्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण

हिंदू धर्मात श्रावण हा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. या दिवसांत भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

Updated: Jul 23, 2016, 02:00 PM IST
श्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण title=

मुंबई : हिंदू धर्मात श्रावण हा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. या दिवसांत भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच शंकराची कृपादृष्टी कायम राहते. त्याचप्रमाणे शंकरासंबंधित वस्तू घरात ठेवल्यास घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. त्यामुळे श्रावण महिन्यात या वस्तू घरात आणल्यास होतील सर्व मनोकामना पूर्ण.

त्रिशूळ - घरात त्रिशूळ ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक उर्जा घरात येत नाही. त्यामुळे घरात तांबे अथवा चांदीचे त्रिशूळ ठेवा.

रुद्राक्ष - असे म्हटले जाते रुद्राक्ष हे भगवान शंकराच्या डोळ्यांतील अश्रूंनी तयार झाले. त्यामुळे घरात रुद्राक्ष असणे शुभ मानले जाते. 

तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा - घरात सुख शांती, प्रेम कायम राहावे तर घरात नेहमी एक ताब्यांच्या धातूचा तांब्या पाण्याने भरुन ठेवा.

सोने अथवा चांदीचा नंदी - शंकराचे वाहन नंदी आहे. त्यामुळे घरात सोन्याचा अथवा चांदीचा नंदी ठेवल्यास आर्थिक समस्या येत नाहीत.