मुंबई : इंग्रजी कालदर्शिकेनुसार शुक्रवारी ८ एप्रिलला गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरी गुढी उभारुन गोडाचं जेवण करण्याची परंपरा आहे.
यंदाच्या पाडव्याला विक्रम संवत २०७३ ला सुरुवात होईल.
गुढीपाडव्याला तेलाने स्नान करुन कडूलिंबाचे पान खाण्याची प्रथा आहे. 'साडे तीन मुहुर्तांपैकी' एक असणारा हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी कोणत्याही वेळी शुभकार्य करणे चांगले असते.
७ एप्रिलला संध्याकाळी ४ वाजून ५३ मिनिटांनी प्रतिपदा तिथीला सुरुवात होणार आहे. तर तिथी समाप्ती ८ एप्रिलला दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी समाप्ती होणार आहे. त्यामुळे ८ एप्रिलला दुपारी १:०५ च्या आत आपले घर सजवा, पूजा करा आणि नववर्षाच्या शुभेच्छा द्या.