घरात आणू नका या 7 मूर्ती

सुख आणि समृद्धीसाठी आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या देवांची मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते.

Updated: Mar 4, 2016, 06:18 PM IST
घरात आणू नका या 7 मूर्ती title=

मुंबई: सुख आणि समृद्धीसाठी आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या देवांची मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते. तुमच्या घरामध्येही अशाच वेगवेगळ्या देव-देवतांच्या मूर्ती असतील, पण वास्तूशास्त्रानूसार काही मूर्ती फक्त देवळामध्येच असाव्यात. त्या मूर्ती घरामध्ये ठेवल्या तर घरातील सुख, समृद्धी निघून जाते. 

शिवलिंग 

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये शिवलिंग ठेवू नये, कारण शिवलिंग शून्य आणि वैराग्याचं प्रतिक आहे. तुम्हाला घरामध्ये शिवलिंग ठेवायचंच असेल तर अंगठ्याच्या आकाराचं शिवलिंग ठेवावं. 

भैरव

भैरव हे शंकराचंचं एक रूप आहे. भैरवाची मूर्तीही घरामध्ये ठेवू नये, असं वास्तू शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. भैरव हा एक तामसिक देव आहे. तंत्र आणि मंत्राद्वारा त्याची साधना केली जाते. पण कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीसाठी प्रेमाची अपेक्षा केली जाते. त्यामुळे घरामध्ये भैरवाची मूर्ती ठेवू नये. 

नटराज

नटराज हे देखील शंकराचचं एक रूप आहे. वास्तूशास्त्रानूसार नटराजाची मूर्ती घरामध्ये असू नये. असं मानलं जातं की भगावन शंकर जेव्हा तांडव नृत्य करतात तेव्हा विनाश होतो. नटराजाच्या रुपात शंकर तांडव नृत्य करत असल्यानं नटराजाची मूर्ती घरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. 

शनी

शनी ग्रहाच्या शांतीसाठी शनीची पूजा करायचा सल्ला ज्योतिषी देतात, पण शनीची मूर्ती मात्र घरामध्ये आणू नये. शनी एकांत, विरह आणि उदासिनतेची देवता आहे.

राहू

राहूच्या शांतीसाठी राहूची पूजा करा पण त्याची मूर्ती घरात आणू नका असं ज्योतिषी सांगतात. राहू एक छाया ग्रह असून तो एक असूर आहे. राहूची पूजा त्याला घरापासून दूर ठेवण्यासाठी केली जाते.

केतू

केतू हा ग्रहही राहू सारखाच असूराच्या शरिरातून उत्पन्न झाला आहे. त्यामुळे त्याची मूर्ती घरात न आणण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. 

उग्ररूपाची देवी

उग्ररूप असलेल्या देवीची मूर्ती विध्वंसाचं प्रतिक आहे. त्यामुळे अशा मूर्ती घरात ठेवण्यापेक्षा सौम्य रूप असलेल्या देवीची मूर्ती घरात ठेवावी.