वर्षातील पहिले सूर्यग्रहण, चुकूनही ही कामे करु नका

आज रविवारी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होणार असून रात्री 10 वाजून 1 मिनिटापर्यंत राहील.

Updated: Feb 26, 2017, 11:29 AM IST
वर्षातील पहिले सूर्यग्रहण, चुकूनही ही कामे करु नका title=

मुंबई : आज रविवारी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होणार असून रात्री 10 वाजून 1 मिनिटापर्यंत राहील.

शास्त्रात अशी काही कामे सांगितलीत जी ग्रहणकाळात करु नये. ग्रहणाच्या काळात तेलाने शरीराला मसाज करु नका. 

या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी. यादरम्यान देवाचा जप करणे उत्तम.

शास्त्रांनुसार ग्रहणाच्या वेळी माणसांनी झोपू नये. ग्रहणकाळात झोपल्याने आजारपण येण्याची शक्यता असते. तर या काळात पुण्य कमावण्यासाठी माणसाने देवाचे स्मरण करावे.

ग्रहण काळात कोणत्याही देवाच्या मूर्तीची पूजा करू नये किंवा मूर्तीला स्पर्श करू नये. पण, या काळात जप किंवा मंत्रोच्चारण करावे. देवाचे स्मरण करावे.