रात्रीच्या वेळी नखे काढणे अशुभ का मानले जाते?

प्राचीन काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश नसल्यामुळे किंवा अन्य प्रकाशजन्य वस्तू नसल्यामुळे नखे कापताना बोटांचे मांस कापले जायचे. त्याला जीव्हाळी म्हणतात. कारण त्या काळात नेल कटर नव्हते. 

Updated: Feb 11, 2015, 08:59 PM IST
रात्रीच्या वेळी नखे काढणे अशुभ का मानले जाते?  title=

मुंबई : प्राचीन काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश नसल्यामुळे किंवा अन्य प्रकाशजन्य वस्तू नसल्यामुळे नखे कापताना बोटांचे मांस कापले जायचे. त्याला जीव्हाळी म्हणतात. कारण त्या काळात नेल कटर नव्हते. 

चाकू, सुरी या सारख्या धारदार वस्तूंनी नखे काढली जायची. दुसरे असे की रात्रीच्या वेळी झाडू मारत नव्हते त्यामुळे नखे घरातच पडत होती. त्यामुळे नखे सकाळी किंवा दिवसा काढल्याने ती गोळा करण्यास सोपी पडायचे. त्यामुळे नखे रात्रीची कापली जात नव्हती. 

ही त्या काळातील अपरिहार्यता होती पण आता ती प्रथा बनली आहे. तुम्ही कधीही नखे कापली तरी चालते. 

शनिवारी नखे कापावी का? 

रात्री नखे कापू नये अशी प्रथा होती तशी अजूनही शनिवारचे नखे कापत नाही. पूर्वीच्या काळी शनिवारी मंदिरात जात असतं. शनिवारी मंदिरात जाताना माणसे अनवाणी पायाने जात असतं. नखे कापल्यानंतर ती पायाला लागून मंदिरात जाऊ नये म्हणून शनिवारी नखे कापली जायची नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.