शिंक येणे अशुभ आहे का?

 बऱ्या वर्षांपासून भारतीय समाजात असे मानले जाते की शिंक येणे अशुभ आहे. पण या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. श्वास नलिकेत अडथळा आला तर शिंक येते त्यामुळे श्वास नलिकेतील अडथळा दूर होतो. बऱ्याचवेळा वेगवेगळ्या अॅलर्जीमुळे सुद्धा शिंक येते. बऱ्याचवेळा शिंक आल्याने मोठ्या प्रमाणात तोंडातून थुंकी उडते तसेच नाकातून पाणी बाहेर येते. त्यातून काही संसर्गजन्य रोग सुद्धा पसरू शकतात. त्यामुळे असे रोग पसरण्याची भीती असल्याने शिंक अशुभ आहे.

Updated: Feb 10, 2015, 08:30 PM IST
शिंक येणे अशुभ आहे का?  title=

मुंबई :  बऱ्या वर्षांपासून भारतीय समाजात असे मानले जाते की शिंक येणे अशुभ आहे. पण या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. श्वास नलिकेत अडथळा आला तर शिंक येते त्यामुळे श्वास नलिकेतील अडथळा दूर होतो. बऱ्याचवेळा वेगवेगळ्या अॅलर्जीमुळे सुद्धा शिंक येते. बऱ्याचवेळा शिंक आल्याने मोठ्या प्रमाणात तोंडातून थुंकी उडते तसेच नाकातून पाणी बाहेर येते. त्यातून काही संसर्गजन्य रोग सुद्धा पसरू शकतात. त्यामुळे असे रोग पसरण्याची भीती असल्याने शिंक अशुभ आहे.

शिंक म्हणजे काय?
फुफ्फुसातील हवा स्फोटागत आवाजासह तोंड आणि नाकाद्वारे बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेस शिंक असे म्हणतात. तपकिरीची, मिरचीची किंवा अन्य पदार्थाची भुकटी, थंड पाणी किंवा थंड हवा यांच्यादिकांच्या नाकाला झालेल्या स्पर्शामुळे वा अन्य कारणांमुळे नाकाचा पडदा(म्यूकस मेंब्रेन) उद्दीपित होतो. त्याशिवाय सर्दीमुळे किंवा जंतुसंसर्गामुळे असे होऊ शकते. अशा वेळी शिंक येते. शिंकेच्या क्रियेमुळे हा जंतुसंसर्ग किंवा सर्दी बाहेर फेकली जाते. शिंक ही मानवी शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे.

शिंक समज आणि गैरसमज 

शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु पुरातन काळापासून एखादे शुभ कार्य करत असताना शिंक येणे म्हणजे अशुभ मानले गले आहे.
शिंक येणे काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते. त्यातील काही शुभ व अशुभ घटना खाली सांगितल्या आहेत.
१ - तुम्ही घरातून बाहेर पडत असताना कोणी शिंकले तर तुमच्या कामात अडथळा निर्माण होणार. तीच व्यक्ती एकपेक्षा जास्त वेळेस शिंकली तर तेच काम सहजतेने पूर्ण होईल.
२ - घरात आलेला पाहुणा जाण्याच्या वेळेस कोणी त्याच्या डाव्या बाजूस शिंकले तर तो एक अशुभ संकेत असतो.
३ - खरेदी करताना शिंक आली तर खरेदी केलेल्या वस्तुत फायदा होतो.
४ - झोपण्याच्या अगोदर किंवा झोपेतून उठल्यानंतर शिंकेचा आवाज ऐकला तर अशुभ मानण्यात येते.
५ - नवीन घरात प्रवेश करतांना शिंक आली तर त्या घरात त्यावेळेस प्रवेश करू नये.
६ - एखादा आजारी मनुष्य औषधी घेण्यासाठी निघाला आणि त्याला शिंक आली तर तो लवकर बरा होतो.
७ - जेवण करण्याच्या अगोदर शिंकेचा आवाज ऐकला तर अशुभ मानण्यात येते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.