संतती निवारणासाठी केले जातात हे उपाय

नारायण नागबली : संततीदायक व पीडानिवारक श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास नारायणबली असे म्हणतात.

Updated: Mar 19, 2013, 08:08 AM IST

www.24taas.com
नारायण नागबली : संततीदायक व पीडानिवारक श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास नारायणबली असे म्हणतात. हाविधी येथेच करण्याची अविच्छिन्न परंपरा आहे. ह विधी प्रामुख्याने अनपत्यता दूर होऊन संततिसौख्य लाभावे म्हणुन केला जातो.
पतिपत्नी यांच्या शरीरातील दोष हे संतती न होण्यास एक दुष्ट कारण आहे. शरीरात बिघाडही बाह्य करणाने घडू शकतात. बाह्य शितोष्णादी विकारांनी शरीरात शीतोष्ण बाधा होतात. असा अनुभव आहे.
अनपत्यतेंसहि दोन कारणे असू शकतात. एक इन्द्रियजन्य कारण, दुसरे इन्द्रियातील कारण असू शकते. जी गोष्ट बुद्धिगम्य होत नाही, येथे बुद्धिची गति कुंठित होते, अशा वेळी मानवाने वेदशास्त्रांचाच आधार घेतला पाहिजे.