www.24taas.com, मुंबई
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक फायदे आपणास मिळतात. स्त्रियांनी त्या तुळशीला पाणी घालावे, प्रदक्षिणा घालाव्यात, पूजा करावी,रांगोळी काढावी व सायंकाळी दिवा लावावा. श्रीविष्णूला तुळस प्रिय आहे.
तुळशीच्या पानाने त्याची पूजा केली असता पुष्कळ व्रते, यज्ञ, जप केल्याचे फळ लाभते. दरवर्षी कार्तिक शुध्द व्दादाशीस तुळशीविवाह करावा. तुळस पूजनाने प्रसन्नता लाभते. आणि त्यामुळेच घरातील वातावरण देखील शुद्ध आणि सात्विक राहते.
तुळस ही वनस्पती औषधी वनस्पती आहे. उचकी येत असल्यास तुळशीचा रस थोडा मध घालून चाटावा. भूक लागत नसेल तर रोज नेमाने तुळशीचा रस घेत जावा. तुळशीच्या काढ्याने पडसे ताबडतोब थांबते. थंडीपासून झालेली बाधा नाहीशी होते. दलदलीच्या जागी तुळशी ची लागवड केल्यास त्या जागी डास होत नाहीत तुळशी च्या झाडा मुळे घराच्या आसपासची जागा निरोगी राहते.