<B> <font color=red> जाणून घ्या... यंदाच्या वर्षातील विवाहाचे मुहूर्त! </font></b>

यंदाच्या वर्षात तब्बल ९० दिवस लग्नासाठी योग्य असल्याचं पंचांग सांगतंय. यातील जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १७ दिवस विवाहासाठी शुभ मानले गेलेत. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ एकच दिवस विवाहासाठी योग्य आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 2, 2014, 01:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
यंदाच्या वर्षात तब्बल ९० दिवस लग्नासाठी योग्य असल्याचं पंचांग सांगतंय. यातील जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १७ दिवस विवाहासाठी शुभ मानले गेलेत. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ एकच दिवस विवाहासाठी योग्य आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अचूक वेळ साधण्यासाठी लोकांना अधिक धावपळ करावी लागणार आहे.
वर्ष २०१४ मध्ये वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीसाठी ९० दिवशी योग्य मुहूर्त आहे. गेल्या वर्षी १२६ दिवशी विवाहाचा योग जुळून आला होता. त्यामानानं यावर्षीची विवाहाच्या मुहूर्तांची संख्या कमी झालीय. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विवाहासाठी कोणताही मुहूर्त नाही

पाहुयात कोणत्या महिन्यात... किती आणि कोणत्य दिवशी आहे लग्नासाठी योग्य मुहूर्त…
* जानेवारी (११ दिवस) - १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २८ जानेवारी
* फेब्रुवारी (१६ दिवस) – ३, ४, ८, ९, १०, १४, १५, १७, १८, १८, २०, २१, २२, २३, २४ आणि २६
* मार्च (७ दिवस) – २, ३, ४, ७, ८, ९ आणि १४ मार्च
* एप्रिल (९ दिवस) – १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २६, २७
* मे (१५ दिवस) – १, २, ७, ८, १०, ११, १३, १५, १७, १९, २३, २४, २५, २९ आणि ३० मे
* जून (१७ दिवस) – ४, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १९, २०, २१, २४, २५ आणि २६
* जुलै (५ दिवस) – १, २, ३, ४ आणि ५
* नोव्हेंबर (१ दिवस) – ३० नोव्हेंबर
* डिसेंबर (९ दिवस) – १, २, ५, ६, ७, १२, १३, १४ आणि १५

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.