www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रत्नांना कधीही म्हातारपण येत नाही अशी म्हण रत्नक्षेत्रात नेहमी वापरली जाते. तिचा अर्थ, रत्नाला जीर्णावस्था प्राप्त होत नाही असा आहे. रत्ने पैलू पाडल्यानंतर जशी असतात तशीच कायम राहतात. वरील सर्व विधाने खनिज रत्नांना तंतोतंत लागू पडतात.
मोती आणि पोवळा मात्र याला अपवाद आहे. त्यांच्या स्वरुपात बदल होत असतो. स्वच्छतेचा प्रश्न खर्या अर्थाने पोवळे आणि मोती यांच्या बाबतीतच निर्माण होऊ शकतो. यापैकी पोवळे किंवा प्रवाळ ही रत्ने अल्पमोली असल्यामुळे त्यांची स्वच्छता करून अंगावर धारण करण्यापेक्षा ती नव्याने विकत घेऊन धारण करणे योग्य ठरते. आता प्रश्न रहातो मोत्याच्या बाबतीत... मोती हे मौलिक रत्न आहे. त्याची स्वच्छता करून किंवा त्याची दुरुस्ती करून ते पुन्हा अंगावर धारण करणे शक्य असते. मोती रत्न कशा व कोणकोणत्या पद्धतीनुसार स्वच्छ व दुरुस्त करता येते?
*ती रत्न अनेक आवरणातून तयार होत असते. त्यामुळे मोत्याची सालं निघू शकतात... असे झाले की मोती दुरंगी दिसू लागतो. मोत्याचा वरील पदर किंवा आवरण कुशल कारागिराकडून धारेच्या बारीक पात्याच्या चाकूने काढून टाकल्यास मोत्याचे बाह्य स्वरुप स्वच्छ, तेजस्वी दिसू शकते.
* पुष्कळ दिवस वापरलेले छिद्राचे मोती कचरा साचून खराब होतात. असे मोती विशेषत: माळेतील असतात. त्यांना स्वच्छ, शुद्ध करण्याकरिता तांदळाच्या टरफलाचा अथवा समुद्र फेसाचा उपयोग करतात. त्यांना शुद्ध करण्यासाठी हातात प्रथम समुद्रफेस किंवा तांदळाची टरफले घेऊन त्यावर दोन ते तीन मोती घेऊन खूप घासावे. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवावे आणि पांढऱ्या स्वच्छ सुती कापडाने पुसावेत. म्हणजे ते स्वच्छ होऊन त्यांच्यात नवीन तेज निर्माण होते. माळेतील मोती स्वच्छ करण्याच्या हेतूने गरम पाण्यात टाकू नयेत. त्यामुळे ते खराब होऊ शकतात.
*मोती स्वच्छ करण्याची तिसरी पद्धत अशी. तांदूळ चांगले कांडून एका भांड्यात घालावे त्यात पाणी टाकून एका चुलीवर ठेवावे. भांड्यातील तांदूळ आणि पाणी थोडे कोमट होईल एवढीच उष्णता त्यास द्यावी. अशा तांदूळ आणि पाणी यांच्या मिश्रणाने मोती चोळून काढावेत. त्यानंतर ते चांगल्या स्वच्छ पाण्याने धुऊन पांढऱ्या रेशमी कापडाने पुसावे, म्हणजे ते स्वच्छ होतात. चुलीवरील मड्नयातील तांदूळ आणि पाण्याला जास्त उष्णता देऊ नये. कारण अशा मिश्रणात मोती घासल्यास ते बिघडून खराब होऊ शकतात.
*मोती शुद्ध करण्याची आणखी एक पद्धती म्हणजे गव्हाचा कोंडा घेऊन तो मड्नयात किंवा पातेल्यात टाकावा. त्यात पाणी घालून त्या मिश्रणाला खूप उष्णता द्यावी. त्यानंतर ते मिश्रणाचे भांडे चुलीवरून उतरावे. भांड्यातील मिश्रण चांगले निवाल्यावर त्या मिश्रणाने मोती घासावे. शेवटी स्वच्छ पाण्याने मोती धुऊन कापडाने पुसावे. मोती स्वच्छ व शुद्ध होतात.
*मोती शुद्ध करण्याची जुनी पाचवी रीत अशी आहे की, रिठ्याचे पाणी हातावर घेऊन माळेतील फक्त चार-पाच मोती घेऊन खूप घासावेत. घासल्यावर बाजूला ठेवावेत. सर्व मोती याप्रमाणे तीन वेळा घासावे. या क्रियेमुळे मोती अत्यंत तेजस्वी व टिकावू बनतात. मोत्यांचे बाह्य शरीर यामुळे शुद्ध होते. परंतु या प्रक्रियेत छिद्रातील घाण तशीच राहते. ती जावी म्हणून हे मोती एका रेशमी दोऱ्यात ओवावेत. दोर्यादचे एक टोक दातात धरावे व दुसरे टोक डाव्या हाताने धरावे आणि उजव्या हाताने दोर्यारतील मोती घासावे. म्हणजे मोत्याच्या छिद्रातील घाण निघून जाते. अशाप्रकारे मोत्याचा आतील भाग स्वच्छ होतो.
*मोती रत्न शुद्ध करण्याची आणखी एक पद्धत अशी की, तुरटीची पूड, मीठ आणि क्रीम ऑफ टार्टर या पदार्थाचे मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात पाणी टाकावे. त्याला उष्णता द्यावी. त्यानंतर ते मिश्रण साधारण थंड होऊ द्यावे. नंतर हातावर मोती घेऊन ते त्या मिश्रणाने खूप चोळावे म्हणजे मोत्याला चकाकी प्राप्त होते. या मिश्रणाने घासलेले मोती कोमट पाण्याने धुवावेत. हे पाण्याने धुतलेले मोती कापडाने पुसण्याऐवजी एका कागदावर ठेवून दोन दिवसापर्यंत सुकू द्यावेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.