विवाह जुळण्यासाठी अशी करा गणेशोपासना

तुम्ही जर विवाहेच्छुक असाल, आणि तुमचा विवाह जुळण्यास अडचणी येत असतील किंवा अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गणपतीची उपासना करावी. ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत, ज्यांना मनासारखी वधू अथवा वर मिळत नसेल त्यांच्यासाठी गणपतीची उपासना उपयुक्त ठरू शकते.

Updated: Jun 18, 2012, 06:30 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

तुम्ही जर विवाहेच्छुक असाल, आणि तुमचा विवाह जुळण्यास अडचणी येत असतील किंवा अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गणपतीची उपासना करावी. ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत, ज्यांना मनासारखी वधू अथवा वर मिळत नसेल त्यांच्यासाठी गणपतीची उपासना उपयुक्त ठरू शकते. कारण गणपती बाप्पा विवाहकार्यातील विघ्नंही दूर करतो.

 

विवाह जुळण्यास समस्या येत असतील तर खालील मंत्राचा जप केल्यास तुमच्या विवाह मार्गातील अडचणी दूर होतील आणि मनासारखा जोडीदार मिळेल.

 

मंत्र- ओम ह्रीं ग्रीं ह्रीं

 

विधी

 

तुमचा विवाह जुळण्यास अडचणी येत असतील, तर गणेश चतुर्थीच्या सुमारास एखाद्या कुंभाराच्या अंगणातून माती आणून गणपती तयार करा. अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज या मूर्तीचे पूजन करा. लाडूचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर लाल चंदनाच्या माळेने वर दिलेल्या मंत्राचा ५ माळा जप करा. या मंत्राचा जप अनंत चतुर्दशीनंतरही चालू राहू द्या. या नंतर लवकरच तुमचं लग्न ठरेल. लग्न ठरताच गणेशाची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा.