www.24taas.com, मुंबई
तुम्ही घर किंवा जागा खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. जागा खरेदी अथवा घेताना वास्तूशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अनयथा आपल्या स्पप्नाला धक्का पोहोचू शकतो, असे वास्तूशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचे मत आहे.
जागा घेताना प्लॉट वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन केले नाही तर घर बांधल्यानंतर आपल्याला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असते. जागा खरेदी करण्यापूर्वी खालील नियमाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. जागा खरेदी करून आपल्या इच्छेनुसार घर बांधण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरेल. त्यासाठी काही करण्याचे गरजेचे आहे.
तुम्ही एवढेच करा....
. ईशान्य कोपरा नसेल, याची खात्री करा.
. शक्यतो दोन मोठ्या प्लॉटच्या मध्ये फसलेला लहान प्लॉट, घेण्याच्या भानगडीत पडू नका.
. प्लॉटचे तोंड (घर बांधायचे असल्यास) पूर्व-आग्नेय, नैऋत्य किंवा वायव्य दिशेला असू नये.
. जागा घेताना कठिण किंवा टणक जमीन आणि त्यावर खड्डे पडलेले असतील, तर चांगले नाही.
. जर ईशान्य कोपरा गोलाकार असेल तयावेळी विचार जरूर करावा
. दक्षिण दिशेला उतार आणि उत्तर दिशेला उंचवटा असेल तर नकोच.
. शेजारच्या प्लॉटला उतार असेल तर शक्यतो खरेदी टाळा
. उत्तर-पूर्व दिशा उंच आणि पश्चिम दिशेला उतार असेल तर तो प्लॉट अशुभ मानला जातो