राज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!

राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 3, 2013, 08:54 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, औरंगाबाद
राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.
एकीकडे राज्यामधल्या विदर्भ, कोकणातली धरणं भरत असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. जुलै महिना सुरू झाला तरीही मराठवाड्यातील धरणात पाणीसाठय़ात मात्र फारशी वाढ झालेली नाही.
जूनमध्ये झालेल्या पावसानं नांदेड जिल्ह्यातल्या विष्णूपुरीमध्ये 12 टक्के, मनारमध्ये 7 टक्के आणि उर्ध्व पैनगंगेत 28 टक्के पाणीसाठा झालाय. मराठवाड्यातल्या अकरा मध्यम प्रकल्पांत पाच टक्के पाणीसाठा आहे.
75 मध्यम प्रकल्पांत 11 टक्के पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पांतल्या पाणीसाठ्यात अजूनही वाढ झालेली नाही. त्यामुळं मराठवाड्यातल्या 717 लघू प्रकल्पांत फक्त सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अजूनही शून्य टक्केच आहे. जायकवाडीत सध्या मृत पाणीसाठयामध्ये 609 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.