आता व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांत तक्रार करा

पोलिस ठाण्यात जावून तक्रार करण्याची अनेकांना भिती वाटते, मात्र ही भिती बाळगण्याचे आता कारण नाही. आता थेट व्हॉट्सअॅपवरुन तुम्हाला पोलिसांत तक्रार दाखल करता येणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही नवी सुविधा सुरु केलीय. नागरिकांना तक्रार करण्यासाठी दोन व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक औरंगाबाद पोलिसांनी जाहिर केले असून त्यासाठी खास एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय. 

Updated: Nov 27, 2015, 04:33 PM IST
आता व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांत तक्रार करा title=

औरंगाबाद : पोलिस ठाण्यात जावून तक्रार करण्याची अनेकांना भिती वाटते, मात्र ही भिती बाळगण्याचे आता कारण नाही. आता थेट व्हॉट्सअॅपवरुन तुम्हाला पोलिसांत तक्रार दाखल करता येणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही नवी सुविधा सुरु केलीय. नागरिकांना तक्रार करण्यासाठी दोन व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक औरंगाबाद पोलिसांनी जाहिर केले असून त्यासाठी खास एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय. 

औरंगाबादमधील नागरिकांना त्यांची कोणतीही तक्रार ८३९००२२२२२ अथवा ७७४१०२२२२२ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करता येईल.ही तक्रार आल्यानंतर  पोलिसांकडून तात्काळ मदत दिली जाईल. यासाठी औरंगाबाद पोलिस आयुक्तलयात खास नियंत्रण कक्ष तयार कऱण्यात आला  असून पोलिसांच्या चार्ली पथकावर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आतापर्यंत औरंगाबादकरांच्या १० हजारापेक्षा जास्त तक्रारी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोलिसांकडे दाखल झाल्या असून त्यापैकी २५०० हजारांवर तक्रारींचे निवारण कऱण्यात आले आहे. समाजात काही चुकीचे घडत असल्यास त्याची माहिती नागरीक व्हॉट्सअॅपवर पोलिसांना कळवू शकतात. विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याची हमी पोलिसांनी दिलीय. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तक्रारी करणा-यांमध्ये महाविद्यालयीन मुला मुलींची संख्या अधिक असून मुलींच्या अनेक समस्या सोडवण्यात पोलिसांना यश आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.