प्रवीण तोगडियांवर गुन्हा दाखल; तुरुंगात जाणार?

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया चांगलेच अडचणीत आलेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 8, 2013, 10:17 AM IST

www.24taas.com, नांदेड
प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया चांगलेच अडचणीत आलेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
२२ जानेवारीला भोकरमध्ये प्रवीण तोगडियांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं. याच भाषणामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वक्तव्याची केंद्रीय गृहमंत्रालयानंही दखल घेतली असून महाराष्ट्र सरकारला कारवाईबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलीय. तोगडिंयांचे वक्तव्य तपासले जाणार काही प्रक्षोभक आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलीय.

काही दिवसांपूर्वीच हैद्राबादमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशमधील एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर विहिंप नेते प्रवीण तोगडिया हे प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी अडचणीत आले आहेत. ओवेसींप्रमाणे तोगडियांनाही अटक होणार का? असा सवाल विचारला जातोय.