www.24taas.com, विरार
आईचं प्रेम काय असतं... याची अनुभुती तुम्हा-आम्हाला प्रत्यक्षातही आजवर अनेकदा आली असेल... पण, जन्मताच आपल्या आईला गमावणाऱ्या एका वासरालाही आई काय असते... तिच्या प्रेमाची ऊब काय असते... हे समजलंय... या वासरासाठी आई बनलीय चक्क एक 'कुत्री'... मातृप्रेमाला तोड नसते, याची प्रचितीच विरारमध्ये पाहायला मिळतेय.
एका गायीच्या वासराला चक्क कुत्रीचा लळा लागलाय. ही कुत्रीच या वासराला आपलं दूध पाजतेय. आपल्या पिलांसोबतच पोटच्या गोळ्याप्रमाणं ही कुत्री गायीच्या वासराचाही सांभाळ करतेय. वासराचा जन्म झाल्यानंतर काही दिवसात गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर भुकेनं व्याकूळ झालेल्या वासराची दूधासाठी तगमग सुरू होती. अशावेळी या कुत्रीनं या वासराला माया लावली. त्या दिवसापासून वासरु कुत्रीचं दूध पितंय.
असं हे अनोखं मातृप्रेम माणसालाही एक अनोखा संदेश देऊन जातंय.