निवडणुकीच्या रिंगणात आता पान टपरीवाला

निवडणूकांचे वेध सगळ्यांनाच लागलेत. त्यातच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारी कर्मचारी असो वा शिक्षक कुणीही यातून सुटलं नाही. याच चढाओढीत आता पान टपरीचालकांनी उडी घेतलीय. मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील टपरीचालक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या रिंगणात उतरणार आहे.. त्यामुळे पानानं तोंड लाल करणारे हात निवडणुकीत किती रंगत आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 11:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
निवडणूकांचे वेध सगळ्यांनाच लागलेत. त्यातच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारी कर्मचारी असो वा शिक्षक कुणीही यातून सुटलं नाही. याच चढाओढीत आता पान टपरीचालकांनी उडी घेतलीय. मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील टपरीचालक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या रिंगणात उतरणार आहे.. त्यामुळे पानानं तोंड लाल करणारे हात निवडणुकीत किती रंगत आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...
पान बनारसी असो वा कलकत्ता वा मसाला वा मकई कुठलंही पान रंगत आणतेंच.. पण हे पान बनवून तुमचं आमचं तोंड लाल करणारे हात आता मतदानाचा जोगवा मागताना दिसणार आहेत... होय, राज्यभरात 60 लाख पान टपरी चालक आहेत. मात्र त्यांच्या कुठल्याही मागण्यांचा विचार सरकार करत नाही. त्यामुळे आता या पानटपरी चालकांनी थेट निवडणुकांच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केलीय.
बंधन आणायचं असल्यास दारू आणि सिगरेटवर आणायला हवं मात्र धनाड्य लॉबी या पदार्थांचं उत्पादन करत असल्यानं त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पानटपरीचालक करताय. आमच्या आयुष्याचा प्रश्न असल्याने आम्ही रिंगणात उतरणारच असा विश्वास पानटपरी चालक व्यक्त करताय..
पानटपरी चालकांचं कुटुंब त्यांच्या व्यवसायावरच जगतं हे जरी खरं असलं तरी शरीरास घातक पदार्थ विकण्याचं वा विकणा-यांचं समर्थन नाही.. मात्र निवडणुकांच्या तोंडावर यांनी उपसलेलं हत्यार सत्ताधा-यांच्या नाकात दम आणू शकतं यात शंका नाही. त्यामुळे मतांसाठी लाचार असलेले सर्वच राजकीय पक्ष आता टपरीचालकांच्या या निर्णयाकडे कसं लक्ष देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ