निपुत्रिक दाम्पत्याने केले ६ महिन्यांच्या बाळाचं अपहरण

मागितल्यावरही दत्तक दिलं नाही म्हणून एका निपुत्रिक दाम्पत्याने ६ महिन्याच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना नागपूरमध्ये घडलीय. या प्रकरणातील आरोपी दांपत्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पण आरोपी दाम्पत्य वारंवार आपलं ठिकाण बदलत असल्यानं पोलिसांना अजूनपर्यंत निराशाच हाती आलीय. महत्वाचं म्हणजे घात करणारा व्यक्ती बाळाच्या वडिलांचा चांगला मित्र आणि शेजारी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 09:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
मागितल्यावरही दत्तक दिलं नाही म्हणून एका निपुत्रिक दाम्पत्याने ६ महिन्याच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना नागपूरमध्ये घडलीय. या प्रकरणातील आरोपी दांपत्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पण आरोपी दाम्पत्य वारंवार आपलं ठिकाण बदलत असल्यानं पोलिसांना अजूनपर्यंत निराशाच हाती आलीय. महत्वाचं म्हणजे घात करणारा व्यक्ती बाळाच्या वडिलांचा चांगला मित्र आणि शेजारी आहे.
जगदीश नगरात भागात राहणारं हे राहुल आणि रंजना रोकडे दाम्पत्य, आपल्या ६ महिन्याच्या चिमुकल्याला बघण्याकरता व्याकूळ आहे. ६ महिन्यांपूर्वी राहुल आणि रंजनाला गोंडस बाळ झालं. शेजारी राहणाऱ्या उइके दाम्पत्याशी रोकडे परिवाराची जवळीक असल्यानं त्यांचं एक-दुसऱ्याच्या घरी येणं-जाणं होतं. उइके दाम्पत्याला लग्नाच्या ४ वर्षानंतरही मूलबाळ नसल्यानं त्यांनी रंजनाला बाळ दत्तक देण्याची मागणी केली होती. पण रंजना आणि राहुल यांनी त्याला कायमच नेहमीच नकार दिला होता. पण आपल्या नकाराची इतकी मोठी किंमत चुकवावी लागेल याची पुसटशीही कल्पना रोकडे दाम्पत्याला नव्हती.
दत्तक देण्यास नकार दिल्याने रंजनचा अनेक वर्षांचा मित्र आणि शेजारी धनराज उइके आणि त्याची पत्नी दुर्गा यांनी ६ महिन्याच्या रुद्रचं अपहरण करण्याचा प्लान तयार केला. ठरल्याप्रमाणे १६ जानेवारीला ते रुद्राला खेळवायला घरी घेऊन गेले आणि संधीचा गैफायदा घेऊन त्यांनी रुद्रचे अपहरण केल. रंजना आणि राहुलने धनराज उइके आणि त्याच्या पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीचा मोबाईल बंद असल्यानं त्यांचा शोध लागला नाही.
शेजाऱ्यांवर विश्वास ठेऊन आपल्या पोटच्या गोळ्याला केवळ खेळवायला दिल्याचा पश्चाताप या आईला आता होतोय. दरम्यान आरोपींच्या शोधात पोलिसांनी रायपूर, हैदराबाद, सिकंदराबादसह अनेक शहरात पथकं पाठवली असली तरीही अजूनपर्यंत पोलिसांना यश आलेलं नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ