स्पॉट फिक्सिंगचं `महाराष्ट्र कनेक्शन` उघड

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड होतंय. या प्रकरणी आणखी तिघांना औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 19, 2013, 08:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड होतंय. या प्रकरणी आणखी तिघांना औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये माजी रणजी क्रिकेटरचा समावेश आहे. मनीष गुडेवा असं त्याचं नाव असून तो अजित चंडिलाचा मित्र असल्याचं सांगण्यात येतंय. याशिवाय औरंगाबादमधून सुनील भाटिया आणि किरण डोळे या बुकींनाही अटक करण्यात आलीय. बाबूराव यादव नावाच्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.
दरम्यान, एका मराठी अभिनेत्रीचे श्रीसंतसोबतचे फोटो या लॅपटॉपमध्ये सापडलेत. या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप्सही आढळल्याची माहिती आहे. तसंच त्याच्या डायऱ्यांमध्ये अनेक मुली, अभिनेत्री, मॉडेल्सचे मोबाईल नंबर, पत्ते सापडलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.