दहशतवादाचं जाळं खंडीत... असदच्या भावाचीही झाडाझडती

औरंगाबाद एटीएसने दहशतवादी असदचा भाऊ हुसैन खान याला ताब्यात घेतलयं. त्याच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्सवरून अधिक माहिती मिळण्यात येणार आहे.

Updated: Oct 12, 2012, 04:34 PM IST

www.24taas.com, पुणे
औरंगाबाद एटीएसने दहशतवादी असदचा भाऊ हुसैन खान याला ताब्यात घेतलयं. त्याच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्सवरून अधिक माहिती मिळण्यात येणार आहे. त्याचबरोबर असदच्या घराच्या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे आणि घरातील मोबाईल फोन्सही जप्त करण्यात आले आहेत.
असद खान हा औरंगाबादपासून जवळ असलेल्या नायगाव गावातील तवक्कल नगरमधला रहिवासी आहे. गेल्या १२ वर्षांपासून असदचे कुटुंब नायगाव येथे राहतात. असदचा एक भाऊ मालेगाव येथील एका मदरशात शिक्षण घेतोय. असद हा विवाहीत असून त्याचे औरंगाबादेत फार कमी वास्तव्य होते. अधूनमधून तो औरंगाबादेत येत होता. नायगाव परिसरात असद खानच्या कुटुंबीयांनी दीड एकर जमिन विकत घेतली आहे. त्यावर प्लॉटींग पाडून ते विकण्याचा आणि टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असजचे कुटुंबीय करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मराठवाड्यात दहशतवादाचं जाळं?
दरम्यान, पुणे बॉम्बस्फोट आणि वेरुळ शस्त्रसाठाप्रकरणाचा सूत्रधार असलेला अतिरेकी फय्याज कागझी मराठवाड्यातील २० ते २५ तरूणांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती उघड झालीये. या तरूणांचे मित्रही फैयाज कागझीच्या संपर्कात असल्याची पोलिसांना माहिती आहे. मराठवाड्यात अतिरेक्यांचे मोठे जाळे बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता. फैय्याज कागझीने मराठवाड्यात अतिरेक्यांचे स्लीपर सेल बनवलेत काय याचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मराठवाड्यात एटीएस मोठी धरपकड करणार असल्याचंही स्पष्ट होते. या तरूणांपैकीच काल अटक झालेला असद औरंगाबादचा आहे तर इम्रान नांदेडचा...