www.24taas.com, मुंबई
दहशतवादी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ला फाशी दिल्यानंतर, २००१ मध्ये संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूला फाशी केव्हा होणार, असा प्रश्न विचारण्यात येत होता. पाच दहशतवाद्यांनी संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी हल्ला करून नऊ सुरक्षा रक्षकांना ठार मारले होते. त्यानंतर उडालेल्या चकमकीत पाचही दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला होता. या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर देशभरातून त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती.
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर १२ वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप अफजलच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष होता. पण आज अखेर त्याला पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास फासावर लटकविण्यात आलं.
आत्ताच का दिली गेली अफजललं फाशी? पहिल्यांदा कसाब आणि आता अफजल गुरु? पाकिस्तानला भारतानं एक मूक संदेश दिलाय का? काय वाटतं तुम्हाला?... मांडा तुमचं रोखठोक मत...
आपलं मत आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रतिक्रिया.... तुमच्या प्रतिक्रिया दाखविण्यात येतील आमच्या विशेष कार्यक्रमात