अफजल गुरूच्या फाशीचा आजचा दिवस - गृहमंत्री

संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याच्या फाशीची तारीख आधीच ठरली होती. त्यानुसार आजचा दिवस निवडण्यात आला, अशी फाशीची औपचारिक घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2013, 01:08 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याच्या फाशीची तारीख आधीच ठरली होती. त्यानुसार आजचा दिवस निवडण्यात आला, अशी फाशीची औपचारिक घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसद हल्ल्यात दोषी ठरलेल्या अफजल गुरू याची दया याचिका ३ फेब्रुवीरी रोजी फेटाळली. फाशीच्या फाईलवर ४ फेब्रुवारी रोजी मी सही केली. त्यानंतर ९ फेब्रुवारी शनिवारी सकाळी ८ वाजता तिहार जेलमध्ये अफजल गुरूला फाशी देण्यात आली.

ज्यावेळी मी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर दुसऱ्यांदा अफजल गुरूची फाईल राष्ट्रवतींनी माझ्याकडे पाठविली. त्यानंतर मी त्याचा अभ्यास केला आणि २१ जानेवारीला राष्ट्रपतींकडे ती पाठवून दिली. त्यानंतर ३ फेब्रुवारी राष्ट्रपतींकडून माझ्याकडे फाईल आली, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
चार फेब्रुवारी रोजी पुढील कारवाई करण्यासाठी फाईल पाठविण्यात आली. त्यानुसार फाशीची तारीख ठरविण्यात आली. ९ फेब्रुवारी २०१३ ही तारीख गुरूला फाशी देण्याची निश्चित करण्यात आली. अफजलने १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी तो दोषी ठरवला गेला. त्याला सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली.