www.24taas.com, नवी दिल्ली
दहशतवादी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ला फाशी दिल्यानंतर, २००१ मध्ये संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूला फाशी केव्हा होणार, असा प्रश्नर विचारण्यात येत होता. अफजल गुरूला दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्याच्या फाशीची तयारी करण्यात सकाळी सुरू होती. त्याला तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली.
अफजल गुरूची फाइल जास्त काळ प्रलंबित राहणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. अफजल गुरूची फाइल जास्त काळ प्रलंबित ठेवली जाणार नाही. त्याची फाइल माझ्याकडे आल्यानंतर ४८ तासांमध्ये त्यावर निर्णय घेईन, असे शिंदे यांनी सांगितले होते.
संसदेवर २००१ साली दहशतवादी हल्लाप्रकरणी या हल्ल्याचा सुत्रधार अफझल गुरूचा दया अर्ज पुढील कारवाईसाठी २७ जुलै २०११ रोजी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला होता. तो फेटाळण्यात आला होता.
संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने २००२ साली अफझल गुरूला फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा कायम ठेवली. शेवटी या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले असता सर्वोच्च न्यायालयाने गुरूची याचिका फेटाळून लावली. मात्र गुरूने शेवटचा उपाय म्हणून राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला.
लालकिल्ला हल्ला प्रकरणी अरिफची फाशी कायम केली. २००० साली लालकिल्ल्यावर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी लष्कर-ए-तैय्यबाचा अतिरेकी मोहमद अरिफ उर्फ अशफाक याची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत असल्याचा निकाल दिला होता.
गुरूला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर १२ वर्षांचा कालावधी लोटला तरी, अद्याप त्याला फासावर दिले गेले नसल्याने जनतेमध्ये असंतोष होता. वारंवार त्याच्या फाशीची मागणी होत होती. आज अफलज गुरूला दोषी ठरविण्यात आले. त्याला पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास फासावर लटकविण्यात आलं.