www.24taas.com, नवी दिल्ली
संसद हल्ला प्रकरणातील दोषी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या दहशतवादी अजमल गुरूला शनिवारी सकाळीच फासावर चढवण्यात आलं. पण, यावेळीही त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चातापाचा भाव नव्हता.
अफजलच्या फाशीबद्दल तिहार जेलच्या विरष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली गेली होती. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणीदेखील अफजल गुरुची मुद्रा शांत आणि स्थिर होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एकही रेषा उमटली नव्हती. फाशीच्या अगोदर गुरुला जेल नंबर तीनमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला शुक्रवारी संध्याकाळीच फाशीबद्दल सूचना करण्यात आली होती. त्यानंतर मात्र तो बेचैन होता.
उत्तर काश्मीरमध्ये राहणारा ४३ वर्षीय अफजल गुरु याला आज शनिवारी सकाळी आठ वाजता जेल नंबतर तीनमध्येच गोपनीयतेत फासावर चढवण्यात आलं. गुरुला फाशी देतेसमयी एक मॅजिस्ट्रेट, एक डॉक्टर आणि जेलचे काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जेलच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अफजल गुरुला सकाळी पाच वाजता जागं केलं गेलं आणि चहा दिला गेला. जागा झाल्यानंतर लगेचच गुरुनं नमाज अदा केला. त्याला सकाळी साडे सात वाजता फाशी देण्याच्या ठिकाणावर नेलं गेलं. त्याला शेवटच्या क्षणी पश्चाताप होता का? या प्रश्नावर तुरंगाचे अधिकारी विमल मेहरा यांनी, तो आनंदी आणि स्थिर होता’ असं म्हटलंय.
फासावर चढवण्याआधी उपस्थित डॉक्टरांनी अफजल गुरुची तपासणी केली. मेहरा यांच्या म्हणण्याप्रमाणे फाशीसमयी केल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अफजल गुरुला फासावर चढवण्यात आलं. त्यानंतर तुरुंगाच्या परिसरातच धार्मिक रिती-रिवाजांसहित गुरुचं शव दफन करण्यात आलं.