www.24taas.com,मुंबई
हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी दिल्या जाणा-या औषधांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्याचं उघड झाल आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं याप्रकरणी अनेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. औषधांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यास यकृत आणि मुत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
औषधांमध्ये लोहाचं प्रमाण वाढल्यानं या गोळ्या चुंबक खेचून घेतात.. हिमग्लोबीन कमी झाल्यावर या गोळ्या दिल्या जातात. मात्र त्यात लोहाचं प्रमाण नियमापेक्षा जास्त आढळल्याने अन्न आणि औषध प्रशासनानं औषध कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
अशी जीवघेणी औषधं बाजारात सर्रास उपलब्ध आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या मानकांनुसार औषधात लोहाचं प्रमाण 100 मिलीग्रॅमपेक्षा कमी असायला हवं. मात्र परिस्थिती वेगळीच आहे. हे प्रमाण जास्त झाल्यावर शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. या कंपन्यांना कारवाईचा डोस जरी सरकार देणार असलं तरी कठोर कारवाई झाल्यास अशी उत्पादनं बाजारात पुन्हा येणार नाहीत.