डान्स करा, फिटनेस टिकवा

आजच्या धावपळीच्या युगात आपला फिटनेस टिकविणे प्रत्येकाला शक्य नसते. मात्र, आपण थोडावेळ डान्स (नाचले तर) केला तर आपला फिटनेस (तंदुरूस्त राहू शकतो.) टिकवून ठेवू शकतो. फिटनेससाठी मग करणार ना डान्स.

Updated: Dec 15, 2011, 02:52 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

आजच्या धावपळीच्या युगात आपला फिटनेस टिकविणे प्रत्येकाला शक्य नसते. मात्र, आपण थोडावेळ डान्स (नाचले तर) केला तर आपला फिटनेस (तंदुरूस्त राहू शकतो.) टिकवून ठेवू शकतो. फिटनेससाठी मग करणार ना डान्स.

 

आजची पिढी फिटनेसबद्दल जागरूक झाली असली, तरी नियमितपणे वर्कआऊट करायला त्यांना कामातून वेळ मिळतोच असं नाही. अशा वेळी डान्सची आपली आवड जोपासून फिटनेस टिकवण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. पाटीर्ज, वेगवेगळे शोज किंवा आपली आवड म्हणून अनेक जण डान्स करतात. काही वेळासाठी मनोरंजन करणारा तुमचा हा छंद स्नायू मजबूत करून तुम्हाला ऊर्जा मिळवून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.


वेगवेगळ्या प्रकारचा डान्स करण्याच्या सवयीतून स्नायू मजबूत होण्यापासून स्टॅमिना वाढेपर्यंत आणि वजन नियंत्रणात ठेवण्यापासून रक्ताभिसरण सुधारणेपर्यंत अनेक प्रकारचे फायदे होतात. काय आहेत फायदे ते पाहू.

 

- नियमित व्यायाम केल्याने फ्रेश राहायला मदत होते.

- घामाच्या रुपात शरीरातील उत्सर्जक पदार्थ निघून जात असल्यामुळे त्वचेला चमक येते.


- पचन संस्थेचं काम नीट होतं. हाडं मजबूत होतात.

- या शारीरिक फायद्यांबरोबरच नियमित डान्स करण्यामुळे मानसिक फायदाही होतो. दिवसाची सुरुवात फ्रेश मूडने होते.

- डान्स शिकवताना नवनिमिर्तीचा आनंद मिळतो. ताणतणावाच्या काळात तर हा एक चांगला पर्याय आहे.

 

आता आपल्याला कोणता डान्स प्रकार निवडायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर कोणताही असंच आहे. तुमच्या आवडीचा डान्स करून आनंद मिळवा.  फिजिकल, मेण्टल, सोशल, इमोशन आणि स्पिरिच्युअल बॅलन्स राखणं म्हणजे आरोग्य. नृत्य करता तेव्हा शारीरिक व्यायाम, ग्रुपमध्ये डान्स करण्याने सोशल आणि इमोशनल, तुमची आवड जोपासत असल्याने मेण्टल आणि संगीताच्या माध्यमातून स्पिरिच्युअल गरजा पूर्ण होतात.

 


डान्स शिकण्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व खुलून येतं. शिवाय, दररोज दोन तास नृत्य केल्याने तुम्ही दोन वर्षांनी तरुण दिसता. अॅरोबिक अॅक्टिव्हिटी म्हणूनही याचा हृदयाला पर्यायाने शरीराला फायदा होतो. तसेच आता कोणते नृत्य केल्याने आपल्याला काय फायदे होतात, ते आता आपण पाहू या .

 

- बॉलरुम डान्समुळे लोअर बॅक (पाठीचा खालचा भाग), मांड्या आणि सीटचा व्यायाम होतो.

- फ्लॅमिंको डान्समधील गेसफुल मुव्हमेण्ट्स तुमचा स्टॅमिना तर वाढवतं शिवाय, तुम्हाला अधिक सजग बनवतो.

- टॅप स्टाइलमधील डान्समुळे शरीर मजबूत होऊन शरीराचा समतोल साधणं सुधारतं.

- साल्सा स्टाइलमुळे शरीर जलद हालचाली करतं शिवाय, श्वसन आणि रक्ताभिसरणाला फायदा होतो.

- रक्तदाबाचा त्रास कमी होऊन कोलेस्टोरॉल नियंत्रणात राहतं. शरीर आणि पायांना आकार मिळतो.

- शरीर लवचिक बनतं.  पाठीच्या समस्या दूर राखण्यास मदत होते.

- स्त्रियांना बाळंतपणातील समस्या कमी करण्यासाठी नृत्य सहाय्य करते.

 

नियमित डान्स केल्यामुळे तुमची काडिर्ओव्हॅसक्युलर क्षमता वाढते. याचा फायदा हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी होतो. तुम्ही जर डान्स ग्रुपमध्ये करत असाल, तर सगळ्यांनी मिळून एन्जॉय करण्याच्या या अॅक्टिव्हिटीमुळे आनंद आणि मानसिक समाधान मिळतं. डान्स करताना जिममध्ये व्यायाम करत असल्यासारखा दृष्टिकोन नसल्याने होणाऱ्या फायद्याचं प्रमाण दुणावतं, असं फिटनेस एक्स्पर्ट सांगतात.