सचिनसारखा 'जिनियस' संघात हवा - धोनी

सचिनसारखा 'जिनियस' संघात असणे हेच महत्त्वाचे आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सचिन तेंडुलकरच्या कर्णधारपदाबाबत न बोलता अशी प्रतिक्रीया दिली.

Updated: Nov 2, 2011, 07:13 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

सचिनसारखा 'जिनियस' संघात असणे हेच महत्त्वाचे आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कर्णधारपदाबाबत न बोलता अशी प्रतिक्रीया दिली.

 

बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनी सचिनच्या कर्णधारपदाबाबत उठविलेल्या प्रश्नाविषयी धोनीला विचारले असता तो म्हणाला, सचिन कर्णधार असताना मी त्याच्या संघात खेळलेलो नाही. सचिन हा संघात असणे हे कायम चांगले असते. मैदानावर त्याचा आम्हाला कायम फायदा होत असतो.

 

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला ६ नोव्हेंबरपासून नवी दिल्लीत सुरवात होत आहे. याबाबत भारतीय संघाच्या आगामी वेस्टइंडीज मालिकेविषयी धोनी म्हणाला, आम्ही या मालिकेत पूर्ण ताकतीने उतरणार आहे. आमची फलंदाजी चांगली असून, गोलंदाजही चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही या मालिकेत चांगली कामगिरी करू.