सचिनने ऑफर स्वीकारली, रेखाही खासदार

विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची ऑफर स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली. सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनु आघा यांच्या नावाचीही शिपारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Updated: Apr 27, 2012, 08:50 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची ऑफर स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली. सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती  अनु आघा यांच्या नावाचीही शिपारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संसदेच्या ‘खेळपट्टीवर’ अवतरणार आहे. सचिन तेंडुलकरसह ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनू आगा हेही आता राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून दिसणार आहेत. सचिन, रेखा आणि अनू आगा यांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्याची शिफारस गुरुवारी काँग्रेसतर्फे करण्यात आली. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यास मंजुरी दिली.

आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धचा सामना खेळण्यासाठी दिल्लीत आलेल्या सचिन तेंडुलकरने गुरुवारी सकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची १०, जनपथ येथे सपत्निक भेट घेतली.  भेटीत सोनिया गांधी आणि सचिन यांच्यात जवळजवळ अर्ध्या तासाची चर्चा झाली. मार्च महिन्यात बांगलादेशविरुद्ध महाशतक पूर्ण करणाऱ्या सचिनला सोनिया गांधींनी वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या.