महाशतक हुकलं तरी सचिन ग्रेटच- स्टीव्ह वॉ

सचिन तेंडुलकर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं १००वं महाशतक झळकावू शकला नाही, तरीही बॅट्समन म्हणून तो सर्वश्रेष्ठच राहाणार. असे उद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह वॉ याने काढले आहेत.

Updated: Feb 7, 2012, 09:24 AM IST

www.24taas.com, मेलबर्न

सचिन तेंडुलकर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं १००वं महाशतक झळकावू शकला नाही, तरीही बॅट्समन म्हणून तो सर्वश्रेष्ठच राहाणार. असे उद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह वॉ याने काढले आहेत.

वॉ म्हणाला की १००वी सेंच्युरी ही खूप मोठी संख्या आहे आणि भारत नेहमीच संख्येच्या बाबतीत उत्सुक असतो. संपूर्ण देशाला असंच वाटतंय की सचिनने १००वी सेंच्युरी लवकरात लवकर करावी. याच गोष्टीचा ताण सचिनवर पडत असेल. सचिनने या तणावातूनही जर १००वं शतक झळकावलं तर कौतुकास्पद आहेत, पण जरी त्याला हे शक्य झालं नाही तरी एक क्रिकेटर म्हणून त्याचं महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही.

जर तेंडुलकरची १००वी सेंच्युरी हुकली तर सचिनची बरोबरी डॉन ब्रॅडमनशी होऊ शकेल. डॉन ब्रॅडमन यांनीही ९९.९४ ची सरासरी असताना क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, असं वॉ म्हणाला. याचबरोबर वॉ असंही म्हणाला की कदाचित १००वं शतक बनवणं हे तेंडुलकरच्या नशिबात नसेलही.. पण, त्याची शक्यता कमी वाटते.