www.24taas.com, मेलबर्न
ऑस्ट्रेलियालाचा माजी क्रिकेटर डीन जोन्स याने म्हंटल आहे की, सचिन तेंडुलकर वन-डे क्रिकेटमध्ये थकल्यासारखा वाटतो आहे. पण भारतीय निवड समितीमधील सदस्यांना सचिनला वन-डेतून रिटायर हो असं सांगण्याची हिंमत नाही आहे असेच दिसते.
जोन्स म्हणतो की, 'वेळ कोणाचीही वाट पाहत नाही, कारण की, वेळेसोबत प्रत्येकालाच चालावं लागतं, मग तो रिकी पॉन्टिंग असो किंवा सचिन तेंडुलकर. दोन्ही खेळाडू ५० ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये थकल्यासारखे जाणवतात त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने या आठवड्यात पॉन्टिंगला एकदिवसीय टीममधून बाहेर ठेऊन स्पष्ट केलं की, आता खुप झालं'.
जोन्सने असंही म्हटंल आहे की, 'जिथवर भारताचा प्रश्न आहे की, तेंडुलकर कितीही वाईट का न खेळो कोणत्याही सदस्यात इतकी हिंम्मत नाही सचिनला सांगेल की, आता तुझं एकदिवसीय करिअर संपलं आहे. लोकांना याची काळजी आहे की, जर सचिनला त्यांच्या मनाविरूद्ध टीम बाहेर ठेवलं तर त्यांच्या घरावर हल्ले होतील. आणि सचिनला जोवर हवं तोवर तो खेळत राहील ज्याने भारतीय टीमला नक्कीच फटका बसणार आहे'.
तेंडुलकरला वन-डे क्रिकेटमधील सर्वकाळ महान खेळाडू आहे. पण याला आता दूर व्हा असं कोणीही सांगू शकत नाही कारण की, त्यामुळे त्यांचे प्रायोजक दूर होण्याची शक्यता असल्याने असे होऊ शकते. सचिनचा खेळ दिवसेंदिवस खराब होत आहे, आणि त्यामुळे भारतीय टीमच्या समस्येत भरच पडते आहे. पण सचिनला वाटत नाही की आपण रिटाअर व्हावे म्हणून.
जोन्स म्हणतो की, खरं सांगायचं झालं तर आजच्या खेळाडूंना वाटतं की, क्रिकेटच्या खेळामधून गडगंज संपत्ती मिळवता येते तर जितकं शक्य आहे तोवर खेळावं. जर सचिनला वाटले तर तो वयाच्या ५० वर्षापर्यंत देखील खेळू शकेल.