टी-२०च्या आव्हानासाठी युवी सज्ज…

कॅन्सरसारख्या आजारातून सावरून भारतीय क्रिकेटफॅन्सच्या गळ्यातला ताईत बनलेला ‘युवी’चं लवकरच मैदानात आगमन होणार आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये होणाऱ्या विश्व ट्वेन्टी-२० खेळायची, त्याची स्वत: ची इच्छा आहे. या मॅचसाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होणं हे एक आव्हान असल्याची त्यालाही जाणीव आहे. पण, त्याबरोबरच या मॅचसाठी आपण नक्कीच मैदानात उतरु, हा विश्वासही त्याच्या मनात आहे.

Updated: Jun 20, 2012, 05:33 PM IST

www.24taas.com, दुबई  

 

कॅन्सरसारख्या आजारातून सावरून भारतीय क्रिकेटफॅन्सच्या गळ्यातला ताईत बनलेल्या ‘युवी’चं लवकरच मैदानात आगमन होणार आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये होणाऱ्या  वर्ल्डकप टी-२० खेळायची, त्याची स्वत: ची इच्छा आहे. या मॅचसाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होणं हे एक आव्हान असल्याची त्यालाही जाणीव आहे. पण, त्याबरोबरच या मॅचसाठी आपण नक्कीच मैदानात उतरु, हा विश्वासही त्याच्या मनात आहे.

 

टीम इंडियासाठी खेळणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान असेल. कारण माझं शरीर ज्या प्रसंगातून जातंय ते कदाचित मलाच समजू शकेल.  कॅन्सरवरच्या उपचारांदरम्यान शरीर प्रचंड थकलंय. त्यातून बाहेर येण्यासाठी माझे  प्रयत्न सुरूच आहेत, असं युवीनं 'आयसीसी क्रिकेट ३६० डिग्री’ या कार्यक्रमादरम्यान म्हटलंय.

 

भारताचा डावखुरा फलंदाज असलेल्या युवीनं आपण नेमकं कधी मैदानात परतणार, हे स्पष्ट सांगितलं नसलं तरी त्यासाठी घाई करणार नसल्याचंही त्यानं सांगितलंय. शरीर जसं साथ देईल तसा मी मैदानात परण्याचा प्रयत्न करेन, मला अजिबात घाई नाही आणि ७५टक्के फिटनेसच्या जोरावर मैदानात परण्याची माझी इच्छा नाही, असंही त्यानं म्हटलंय.  यासाठी सहा महिन्यांची वेळ लागू शकतो किंवा दोन महिन्यांचाही... पण, जेव्हापर्यंत मला स्वत:ला मी फिट आहे, असं वाटत नाही तेव्हापर्यंत मी मैदानात परतणार नाही, असा ठाम निश्चयही युवीनं व्यक्त केलाय.

 

भारत याही वर्षी विश्वविजेती टीम बनेल, असा विश्वास युवीला आहे. आपल्या आजाराबद्दल बोलताना युवी तितकाच भाऊक झाला. ‘माझ्यासारखा ६-७ तास अभ्यास करणारा आणि एखाद्या एथलीटसारका नेहमी धावत राहणाऱ्या व्यक्तीला कॅन्सरसारखा आजार झालाय हे स्विकार करणं सुरुवातीला खूप अवघड गेलं. हे सत्य स्विकारण्यासाठी मला खरंतर खूप वेळ लागला. उपचारादरम्यान वेगवेगळ्या हितचिंतकांकडून खूप धीर मिळाला. ज्यामुळे मी आजारातून लवकर सावरू शकलो.’  २००७ सालच्या आयसीसी ट्वेन्टी -२० वर्ल्डकप चॅम्पियन स्पर्धेत स्टुअर्ट ब्राडच्या एका ओव्हरमध्ये युवीनं मारलेले सहा छक्के आजही त्याच्या फॅन्सच्या आजही लक्षात आहेत. त्यामुळेच तो २०१२चा वर्ल्डकप टी-२० खेळणार की नाही, ही उत्सुकता फॅन्सलाही लागलेली आहे.

 

.

.