www.24taas.com, इंदोर
नुकताच झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान मुंबईतील वानखेडे मैदानावर शाहरूख खानने मोठा धिंगाणा घातला होता. त्यामुळे त्याला एमसीएने पाच वर्षाची बंदी देखील घातली होती. त्यामुळे शाहरूखने तेथील सुरक्षारक्षकाशी केलेली भानगड त्याच्या चांगलीच अगंलट आली होती. त्यानंतर त्यांने त्याची टीम जिंकल्यावर एमसीएची जाहीर माफी देखील मागितली होती.
मात्र तरीही त्याला कोणतीच सहानुभूती दाखविण्यात आली नव्हती. आणि आता त्याच्या याच प्रकरणाबाबत त्याला कोर्टातही खेचण्यात आलं आहे. आता या बॉलिवूडच्या बादशहाला कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. याचिकाकर्ता इंद्रजीत सिंह भाटियाने सांगितले की, प्रथम श्रेणी न्यायालयाने त्याच्यावरील आरोपांसाठी जुलैमधील तारीख दिलेली आहे. सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करणे.
सार्वजनिक ठिकाणी हिंसक वर्तन करणे. यासारख्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालविण्यात येणार आहे. पण काहीच्या मते, तो सेलिब्रेटी असल्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही आणि तो सहजपणे सुटला. त्यामुळेच आता कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात आले. त्यामुळे आता कोर्ट शाहरूखवर काही कारवाई करणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.