चेन्नईचा ब्राव्हो विजय!

अत्यंत चुरशीच्या सामन्यात शेवटच्या चेंडुवर ५ धावांची गरज असताना चेन्नई सुपर किंग्जच्या ब्राव्होने षटकार लगावत कोलकत्ता नाइट रायडर्सवर ५ गडी राखून विजय मिळविला. या विजयामुळे चेन्नईचे सुपर ४ मध्ये जाण्याचे आव्हान टीकले आहे. १७ गुणांसह चेन्नई सुपरकिंग्ज चौथ्या स्थानावर आहे.

Updated: May 14, 2012, 11:57 PM IST

www.24taas.com, कोलकता

अत्यंत चुरशीच्या सामन्यात शेवटच्या चेंडुवर ५ धावांची गरज असताना चेन्नई सुपर किंग्जच्या ब्राव्होने षटकार लगावत कोलकत्ता नाइट रायडर्सवर ५ गडी राखून विजय मिळविला. या विजयामुळे चेन्नईचे सुपर ४ मध्ये जाण्याचे आव्हान टीकले आहे. १७ गुणांसह चेन्नई सुपरकिंग्ज चौथ्या स्थानावर आहे.

शेवटची कर्णधार धोनीने केलेल्‍या तुफानी फटकेबाजीमुळे चेन्‍नईने हे अवघड वाटणारे आव्हान पार केले. सुरूवातीला मायकल हसीने अर्धशतक झळकावताना ३९ चेंडूत ५६ धावा केल्‍या. यामध्‍ये त्‍याने चार षटकार आणि चार चौकार लगावले. फिरकीपटू सुनील नरेनने त्‍याला रजत भाटियाकडे झेल देण्‍यास भाग पाडले. त्‍याच षटकात नरेनने मुरली विजयचा देखील त्रिफळा उडवला. मुरली विजयने २४ चेंडूत ३६ धावा केल्‍या.
सुरवातीला पहिल्या डावात चेन्‍नई सुपरकिंग्‍जला गौतम गंभीरच्‍या कोलकाता नाईट रायडर्सने १५९ धावांचे लक्ष्‍य दिले होते. नाणेफेक हरल्‍यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या नाईट रायडर्सने २० षटकात ६ गडयांच्‍या बदल्‍यात १५८ धावा केल्‍या. नाईट रायडर्सकडून सर्वाधिक गौतम गंभीरने ५८ आणि ब्रेंडन मॅक्‍युलमने ३७ धावा काढल्या.