मुंबई पडली भारी, बंगळुरूला पाजले पाणी

बेंगळूरू- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरच्‍या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्‍सने दणदणीत विजय मिळवलाय. किरॉन पोलार्ड या विजयांचा शिल्पकार ठरलाय.

Updated: May 14, 2012, 10:24 PM IST

www.24taas.com, बंगळुरू

बेंगळूरू- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरच्‍या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्‍सने दणदणीत विजय मिळवलाय. किरॉन पोलार्ड  या विजयांचा शिल्पकार ठरलाय. मुंबईनं १८ ओव्हर्समध्ये  ५ आऊट १४९ रन्स केले. अंबाती रायडू ७७ तर किरॉन पोलार्ड ३२ रन्सवर नाबाद  राहिले.

 

 

रॉयल चॅलेंजर्समध्ये अग्रवाल ६४ रन्सवर नाबाद राहिला. दिलशाननं ४७, तिवारीनं २१ तर विलियर्सनं १४ रन्स काढले. इतर मात्र प्रेक्षकांची घोर निराशा करत अवघ्या काही रन्सवर आऊट झाले.

 

 

मुंबई इंडियन्सचा दिनेश कार्तिक बाद झाल्‍यानंतर आलेल्‍या डॅव्‍हेन स्मिथला हर्षल पटेलने स्थिरवण्‍याची संधीच दिली नाही. स्मिथने पटेलला स्‍वेक्‍अर ड्राईव्‍ह शॉट मारण्‍याच्‍या प्रयत्‍नात उडालेला झेल दिल्‍शानने लिलया टिपला. स्मिथला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. त्‍याने 5 चेंडूत एका चौकारांच्‍या मदतीने सहा धावा केल्‍या. मुंबईचा गडगडलेला डाव सावरताना संयमाने फलंदाजी करणा-या दिनेश कार्तिकला मुरलीधरनने आपल्‍या फिरकीच्‍या जाळयात फसवले. कार्तिकने हवेत मारलेला पॉवरफुल स्‍वीप शॉट सीमारेषेवर उभ्‍या असलेल्‍या हर्षल पटेलने टिपला. कार्तिकने १४ चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा केल्‍या. सचिन मात्र सपशेल फेल ठरला. एकही रन न करता झहीर खाननं त्याला आऊट केलं.

 

 

आयपीएलच्‍या स्कोअरकार्डवर मुंबई इंडियन्‍सनं १६ गुणांसह तिसरं स्थान मिळवलंय. हा सामना जिंकल्‍यानंतर मुंबईला प्‍ले ऑफमध्‍ये आपली जागा निश्चित करता येईल. तर बेंगळुरू रॉयल चँलेजर्स १५ गुणांसह पाचव्‍या स्‍थानी आहे.