माझा आमिष म्हणून वापर होतोय- सानिया मिर्झा

टेनिसमधील वाद सोडवण्यासाठी माझा आमिष म्हणून वापर होत असल्याचा आरोप भारताची टेनिस क्वीन सानिया मिर्झानं केला आहे. याप्रकऱणी तिनं भारतीय टेनिस संघटनेला चांगलंच फटकारलं आहे.

Updated: Jun 27, 2012, 06:48 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

टेनिसमधील वाद सोडवण्यासाठी माझा आमिष म्हणून वापर होत असल्याचा आरोप भारताची टेनिस क्वीन सानिया मिर्झानं केला आहे. याप्रकऱणी तिनं भारतीय टेनिस संघटनेला चांगलंच फटकारलं आहे..

 

मी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भूपतीसोबत खेळते..मात्र सध्या सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी मला न विचारताच माझा जोडीदार निश्चित करण्यात येत असल्याबद्दल तिनं नाराजीही व्यक्त केली आहे.....सानियानं पेस आणि भूपतीवरही याप्रकरणी टीका केला आहे. पण, यासोबतच देशाच्या प्रतिष्ठेसाठी कोणासोबतही खेळण्यास तयार असल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे....

 

दरम्यान आयटानं सानियाचे आरोप फेटाळले आहेत. गुणवत्तेच्या आधारावरच टीम निवड करण्यात आल्याचं आयटानं सांगितलं आहे. दरम्यान महिला डबल्ससाठी मिळालेल्या वाईल्ड कार्डसाठी तिनं आयटाचे आभार मानले आहेत.