प्रोटिन्सद्वारे कँसरवर मात

कँसरपासून आपला बचाव करणाऱ्या प्रोटिन्सचा शोध लावल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या प्रोटिन्समुळे कँसर ट्युमरच्या कोशिकांना शरीरात शिरण्यापासून प्रतिकार करणाऱ्या पेशींची ताकद वाढवतो.

Updated: May 31, 2012, 06:34 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

कँसरपासून आपला बचाव करणाऱ्या प्रोटिन्सचा शोध लावल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या प्रोटिन्समुळे कँसर ट्युमरच्या कोशिकांना शरीरात शिरण्यापासून प्रतिकार करणाऱ्या पेशींची ताकद वाढवतो. ‘वेस्टर्न ऑस्ट्रेलियन इंन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च’चे प्रोफेसर रुथ गांस याच्या नेतृत्वाखाली एक ग्रुप यासंबंधी काम करत आहे.

 

‘प्रेसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायंसेस’ या पत्रिकेत या संदर्भातील माहिती प्रकाशित झाली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर एना जोहान्सन म्हणाल्या की आत्तापर्यंत कँसरच्या उपचारांमध्ये प्रतिकारक्षमता वाढवणारे उपचार इतके यशस्वी झाले नव्हते. कारण ट्यूमर प्रतिबंध करणाऱ्या कोशिकांना टिकू देत नाही.

 

जसजसा ट्यूमर वाढत जातो, तसतसा तो एका बॉलप्रमाणे बनत जातो. प्रतिबंधक कोशिकांना त्यामध्ये घुसणं अशक्य होऊन जातं. जरी या कोशिका आतमध्ये घुसल्या तरी त्या आतमध्ये नष्ट होऊन जातात किंवा आतमधील वातावरणामुळे त्या काम करू शकत नाहीत. त्यामुळे प्रोटिन्सद्वारे प्रतिकारशक्ती वाढवून कोशिकांना सबल करणं कँसरपासून अटकाव करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.