www.24taas.com, वॉशिंग्टन
वजन वाढू नये, यासाठी अनेक पदार्थ जेवणात टाळले जातात. पण याशिवाय जेवणाची वेळही आपलं वजन वाढवू शकते, असं एका संशोधनातून पुढे आलं आहे. रात्री उशिरा जेवल्यास वजन वाढू शकतं, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.
कॅलिफोर्नियातील ‘सॉल्क इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीज’ यांच्या अनुसार रात्री जेवताना एकीकडे इंटरनेटवर काम करत असाल किंवा टीव्ही बघत असाल, तर तुमचं वजन वाढू शकतं.
या संशोधनाचं नेतृत्व करत असलेल्या सहाय्यक प्रोफेसर डॉ. सच्चितानंदन पांडा यांनी सांगितलं, “दिवसातील काही काळ आपले आतडे, मांस पेशी आपल्या कामाची परीसीमा गाठत असतात. इतर वेळी त्या सुषुप्तावस्थेत असतात. या प्रत्येक अंगाची एक वेळ ठरलेली असते. ही वेळ चयापचय चक्र ठरवत असते. जेव्हा इंदिर किंवा माणूस रात्री अपरात्री आहार घेतात, तेव्हा त्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो.” यामुळेच अवेळी आहार घेतल्यास वजन वाढतं आणि शरीर बेढब होत जातं.