www.24taas.com, मुंबई
तुम्हांला माहित आहे का? जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM) कार्डासमवेत तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू नका, तुम्ही त्यास अजिबात विरोध करू नका, अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका. तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये . त्यामुळे फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतात त्याप्रमाणे त्यांना पैसे काढून द्या.
पण आपल्या ATMचा कोडवर्ड हा उलटा टाईप करा. समजा जर का आपला कोडवर्ड १२३४ असेल तर त्या जागी ४३२१ असा टाईप करा. आणि मग त्यानंतर पाहा काय होतं ते. तुम्ही नंबर उलटा टाईप केल्याने ATM मशीनला कळेल की, तुम्ही काही तरी अडचणीत आहात. त्यामुळे ATM मशीनमधून पैसे बाहेर तर येतील मात्र तेही अर्धे आणि अर्धे पैसे अडकतील मशीनमध्येच.
याच दरम्यान तुमची ATM मशीनला कळेल की, तुम्ही फारच अडचणीत आहात . आणि ते जाणवल्याने ATM मशीन ही तुमच्या बॅंकेला आणि जवळील पोलीस स्टेशनला ही सुचना देईल, आणि त्याचबरोबर ATMचा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद होईल. आणि अपहरणकर्त्याला काहीही न कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता. ATM मध्ये पहिल्यापासूनच सिक्युरिटीबाबत अशी सोय करण्यात आली आहे याबाबत फारच कमी लोकांना माहित आहे. तर तुम्ही अपहरणाकर्त्यांला सहजपणे पकडून देऊ शकता.